News18 Lokmat

'प्रस्थानम'मध्ये संजूबाबा 'या' रूपात दिसणार, आज मोशन पोस्टर लाँच

सात वर्षांनंतर संजय दत्त निर्माता बनलाय. प्रस्थानम या तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेकची निर्मिती तो करतोय. या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालं.

News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2018 05:02 PM IST

'प्रस्थानम'मध्ये संजूबाबा 'या' रूपात दिसणार, आज मोशन पोस्टर लाँच

मुंबई, १० जुलै : सात वर्षांनंतर संजय दत्त निर्माता बनलाय. प्रस्थानम या तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेकची निर्मिती तो करतोय. या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालं. सिनेमाचा मुहूर्त नर्गिसच्या जन्मदिनी झाला होता. तर सिनेमाचं शूटिंग सुनील दत्त यांच्या जन्मदिनी सुरू केलं होतं. प्रस्थानम सिनेमात संजय दत्तची मुख्य भूमिका आहे.

Loading...

संजू सिनेमात नर्गिसची भूमिका करणारी मनीषा कोईरला या सिनेमात संजय दत्तबरोबर आहे. ती संजय दत्तच्या पत्नीची भूमिका करतेय.

हक्क दिलात तर रामायण सुरू, खेचून घेतलंत तर महाभारत, ही सिनेमाची कॅचलाईन. सिनेमात जॅकी श्रॉफ, अमायरा दस्तूर, चंकी पांडे, अली फजल यांच्याही भूमिका आहेत. तेलगू प्रस्थानमचा दिग्दर्शक देवा कट्टा हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. सिनेमाचं बरंचसं शूटिंग लखनौला होणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2018 05:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...