News18 Lokmat

सलमान खानचा Bharat अडचणीत, सिनेमाच्या शीर्षकावरून आता नवा वाद

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'भारत' सिनेमाला सेंसर बोर्डनं U/A प्रमाणपत्र दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 31, 2019 07:15 PM IST

सलमान खानचा Bharat अडचणीत, सिनेमाच्या शीर्षकावरून आता नवा वाद

मुंबई, 31 मे : अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा 'भारत'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या 5 जूनला ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण प्रदर्शनाला अवघे 4 दिवस उरले असताना हा सिनेमा आता वादात सापडला आहे. 'भारत' सिनेमाच्या विरोधात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून यात या सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता सलमान खान समोर नवी समस्या उभी राहीली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेनुसार या सिनेमाचं नाव राज्य प्रतीक अधिनियम कलम तीनचे उल्लंघन करतं. या कलमानुसार 'भारत' या शब्दाचा वापर व्यावसायिक उद्देशासाठी करता येत नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यानं या सिनेमाचं नाव बदलण्याची मागणी केली आहे. याशिवाय या सिनेमातील काही संवादही बदलण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. या याचिकेत असं म्हटलं आहे की, या सिनेमातील तो संवाद बदलण्यात यावा ज्यामध्ये सिनेमातील व्यक्तिरेखा स्वतःची तुलना देशाशी करत आहे. हा संवादामुळे लोकांच्या देशभक्तीच्या भावनांना ठेच पोहोचत आहे.

बायको- मुलांसोबत सहा वर्षांनी आमिर खान घरी परतणार

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला भारत सिनेमाला सेंसर बोर्डनं U/A प्रमाणपत्र दिलं आहे. तसेच या सिनेमातील एकही सीन कट न करता हे प्रमाणपत्र देण्यात आलं होतं पण आता मात्र सिनेमात काही बदल केले जातील असं चित्र दिसत आहे.


Loading...'भारत' सिनेमा त्याच्या नावामुळे फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर जगातही प्रदर्शनाआधीच लोकप्रिय झाला आहे. नुकताच ट्विटरनंही या सिनेमासाठी एक स्वतंत्र इमोजी सुद्धा दिला आहे. ज्याचा वापर 'भारत'चे चाहते सिनेमासंबंधीत ट्वीट करण्यासाठी करू शकतात.

संसदेत पोहोताच 'या' TMC खासदारानं केली लग्नाची घोषणा, लाखो चाहते झाले निराश
'भारत' सिनेमा ईदच्या मुहूर्तावर 5 जूनला प्रदर्शित होत असून यात सलमान खान, कतरिना कैफ, दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, तब्बू, सुनील ग्रोवर आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. कतरिनासोबत सलमानचा हा सहावा सिनमा असून या दोघांच्या जोडीला आत्तापर्यंतच्या प्रत्येक सिनेमामध्ये प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आहे.

Bigg Boss Marathi 2: कोण होणार बिग बॉस मराठी २ चा पहिला कॅप्टन?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2019 07:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...