चहा विक्रेता ते पंतप्रधान, बनतोय बायोपिक सिनेमा!

चहा विक्रेता ते पंतप्रधान, बनतोय बायोपिक सिनेमा!

नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारीत असलेल्या या सिनेमाच्या लिखाणाला ते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असतानाच सुरुवात करण्यात आली होती.

  • Share this:

05 जून : बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक सिनेमे मोठ्या प्रमाणात बनवण्यात येत आहेत. प्रेक्षकांकडूनही बायोपिक सिनेमाला चांगलीच पसंती मिळत आहे. संजय दत्तच्या जीवनावरच्या 'संजू'ची चर्चा आहेच.  पण आता आणखी चर्चा आहे ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरच्या बायोपिकची. मोदींची  भूमिका परेश रावल साकारणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसापासून होत होती, ही चर्चा खरी असल्याचे आत्ता परेश रावल यांच्याकडूनच जाहीर झाले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर या सिनेमाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत हे खरे असल्याचे मान्य केले आहे.

नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारीत असलेल्या या सिनेमाच्या लिखाणाला ते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असतानाच सुरुवात करण्यात आली होती. आता ते देशाचे पंतप्रधान झाल्यामुळे कथेत बदल करावा लागणार आहे. यामुळे सिनेमाला उशीर झाला आहे. आधी या सिनेमाची कथा एक चहा विक्रेता ते राज्याचे मुख्यमंत्री अशी असणार होता. पण आता ते पंतप्रधान झाल्यामुळे एक चहा विक्रेता ते देशाचे पंतप्रधान अशा स्वरूपाची असणार आहे.

परेश रावल आता त्यांच्या चाहत्यांना पंतप्रधानांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्याआधी ते संजय दत्तच्या 'संजू' या बायोपिकमध्ये सुनील दत्त यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2018 04:15 PM IST

ताज्या बातम्या