पाकिस्तानी क्रिकेट फॅनचं सैफ अली खानशी गैरवर्तन, VIDEO VIRAL

पाकिस्तानी क्रिकेट फॅनचं सैफ अली खानशी गैरवर्तन, VIDEO VIRAL

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी सैफ अली खान मँचेस्टरमध्ये पोहचला होता. सैफसोबत त्याच्या आगामी सिनेमाची को-स्टार आलिया फर्नीचरवालादेखील होती.

  • Share this:

मुंबई, 17 जून : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019चा 22वा सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगला होता. या सामन्यामध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला. एसाच पराभवाचा धक्का बसलेल्या एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याने अभिनेता सैफ अली खानवर निशाणा साधला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी सैफ अली खान मँचेस्टरमध्ये पोहचला होता. सैफसोबत त्याच्या आगामी सिनेमाची को-स्टार आलिया फर्नीचरवालादेखील होती. सामना संपल्यानंतर ते दोघे परत येत होते. तेव्हा काही पाकिस्तानी क्रिकेट चाहते सैफचा पाठलाग करताना दिसले. त्याचवेळी त्यांनी सैफचा व्हिडिओदेखील शूट केला. यावेळी पाकिस्तानी चाहते सैफसोबत विचित्र बोलत होते.

त्या व्यक्तीने सैफला भारतीय क्रिकेट संघाचा 11वा वॉटरबॉयदेखील म्हटलं. त्या व्यक्तीचं म्हणणं होतं की, सैफने त्याच्या सिनेमांमध्ये अनेक पाकिस्तानी लोकांना मारलं आहे. बरं इतकंच नाही तर त्या व्यक्तीने सैफ अली खानचे आभारही मानले.

या व्हिडिओमध्ये सैफ त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसतं. पाकिस्तानी क्रिकेट चाहता मागे येत असल्यामुळे सैफने आलियालाही प्रोटेक्ट केलं. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याचा हा प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याला लोकांनी लक्ष केलं आहे. त्याच्या वागण्यावर टीका केली आहे.

First published: June 17, 2019, 7:33 PM IST

ताज्या बातम्या