भोजपुरी की क्वीन पाखी हेगडेच्या आयटम डान्सचा Video व्हायरल

भोजपुरी की क्वीन पाखी हेगडेच्या आयटम डान्सचा Video  व्हायरल

पाखीच्या या आयटम साँगला आत्तापर्यंत एक मिल‌ियनपेक्षा जास्त वेळा लोकांना पाहिलंय.

  • Share this:

मुंबई 13 नोव्हेंबर : चित्रपट क्षेत्रापासून काही काळ दूर राहिल्यानंतर भोजपुरी क्वीन पाखी हेगडेने पुन्हा एकदा धमाकेदार एन्ट्री केलीय. भोजपुरी स्टार अभिनेता प्रदीप पांडेय चिंटू याच्यासोबत तिचा 'विवाह' हा चित्रपट आला आहे. यातलं 'तेरे सीने में लगता है दिल नहीं ' हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या पाखी आपल्या जुन्या अवतारात दिसली असून प्रेक्षकांनी तिचं हे गाणं डोक्यावर उचलून घेतलंय. राखीच्या पुनरागमनामुळे भोजपुरीचे चाहते जाम खूश झाले आहेत. पाखीच्या या आयटम साँगला आत्तापर्यंत एक मिल‌ियनपेक्षा जास्त वेळा लोकांना पाहिलंय. पाखीही या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झालीय. या चित्रपटातला एक फोटो टाकत तिने ,'तेरे सिने में लगता है दिल नहीं, तू मेरी मोहब्बत के काबिल नहीं.' असं लिहिलंय. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत तिची फिरकीही घेतलीय.

क्रिकेटच्या एका प्रश्नामुळे अजित कुमारांनी गमावले 7 कोटी! बघा तुम्हाला येतं का?

हे गाणंही तिच्या विवाह या चित्रपटातलं असून प्रवीण रंजन आणि खुशबू जैन यांच्या आवाजात हे गाणं असून संतोष पुरी  यांनी हे गाणं लिहिलं असून मधुकर आनंद यांनी त्याला संगीत दिलंय. या चित्रपटातले तिचे काही फोटो तिने सोशल मीडियावर टाकले असून प्रेक्षकांनी त्यालाही चांगलीच दाद दिलीय.

ऑडिशनच्यावेळी या अभिनेत्रीला करायला सांगितला रेप सिनचा सराव आणि...!

पाखो बरोबरच भोजपुरी अभिनेत्री (Bhojpuri Actress) मोनालिसांच्या (Monalisa) चाहत्यांची काही कमी नाही. भोजपुरी चित्रपट सृष्टीत तिचा एक खास चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी मोनालिसा चाहत्यांसाठी सतत आपले फोटो आणि व्हिडीओ सोस्ट करत असते. त्यात तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज दिसून येतो. मोठ्या पडद्याशीवाय छोट्या पडद्यावरही मोनालिसाने कमाल केली असून तिथेही तिने वेगळं स्थान निर्माण केलंय. नुकताच तिने बाथटबमध्ये स्नान करतानाचा व्हिडीओ पोस्ट केलाय. सोशल मीडियावर तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

मोनालिसाने Instagramवर हा व्हिडीओ शेअर केलाय. त्यात ती आपल्या टीव्ही शोचं प्रमोशन करतेय. 'नजर'या टीव्ही शोचा तो प्रोमो असून त्यात तिने लिहिलंय की 'नजर'चा आजचा एपिसोड बघितलाच पाहिजे. या शो मध्ये ती डायनच्या भूमिकेत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 13, 2019, 9:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading