मुंबई,7 डिसेंबर - बॉलिवूड स्टार कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) येत्या ९ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा (Six Senses Fort Barwara) या ठिकाणी हा लग्नसोहळा पार पडणार आहे. हा सोहळा अतिशय प्रायव्हेट ठेवला जाणार असून यामध्ये दोन्ही कुटुंबांव्यतिरिक्त काही जवळचे पाहुणे आणि मित्र सहभागी होणार आहेत. विकी-कतरिनानं (Katrina Vicky Wedding) आपलं लग्न लोकांच्या नजरेपासून लपवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे अद्यापही दोघांकडून लग्नसोहळ्याच्या बातम्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो लीक होऊ नयेत, याचीही या जोडप्यानं पूर्ण व्यवस्था केली आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी आपल्या लग्नाचे फोटो आणि फुटेजचे पब्लिशिंग राइट्स एका आंतरराष्ट्रीय मासिकाला दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता एका ओटीटी (OTT) कंपनीनं विकी-कतरिनाला त्यांच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओच्या राइट्ससाठी (Photo video rights) मोठी रक्कम ऑफर केली आहे.
समोर आलेल्या बातम्यांनुसार, एका मोठ्या ओटीटी कंपनीनं या जोडप्याला लग्नाच्या व्हिडिओ आणि फोटोंसाठी 100 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. पिंकव्हिलानं देखील आपल्या एका रिपोर्टमध्ये या बातमीला दुजोरा दिला आहे. ही कंपनी विकी-कतरिनाच्या लग्नाचे व्हिडिओ स्ट्रीम करण्याचा विचार करत आहे. यामुळेच कंपनीनं या जोडप्याला एवढी मोठी रक्कम देऊ केली आहे. पाश्चात्य देशांमध्ये हा ट्रेंड अतिशय सामान्य आहे. जेव्हा-जेव्हा एखादं सेलिब्रिटी जोडपं लग्न करतं, तेव्हा ते त्यांच्या लग्नाचे विशेष फुटेज एखाद्या बड्या चॅनेल किंवा मासिकाला विकतात. त्यातून त्यांना बक्कळ पैसा मिळतो.
जर विकी आणि कतरिनाने ही ऑफर स्वीकारली तर ही त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच ट्रीट ठरेल. दोघांनी ऑफर स्वीकारल्यास ओटीटी कंपनी त्यांच्या लग्नातील सर्व फंक्शन कव्हर करेल आणि नंतर ते 'फीचर' (Feature) म्हणून प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करेल, असं म्हटल जात आहे.
दरम्यान, विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नातील विधींना आजपासून (7 डिसेंबर 2021) सुरुवात होणार आहे. काल रात्री (6 डिसेंबर 2021) दोघेही पोलिसांच्या कडक बंदोबस्तात राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील चौथ बरवारा शहरात पोहोचले आहेत. जयपूर विमानतळाहून तीन आलिशान कारमधून दोघेही आपल्या कुटुंबियांसह विवाहस्थळ असलेल्या सिक्स सेन्स बरवरा फोर्ट हॉटेलमध्ये पोहोचले. त्याठिकाणी त्यांचं मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Katrina kaif, Vicky kaushal, Wedding