S M L

लग्न नाही तर 'या' कारणामुळे दीपिकाकडे कोणताही नवीन सिनेमा नाही

संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावत या सिनेमात दीपिकाने सगळ्यांचंच मन जिंकलं होतं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड तोडले. त्यात दीपिकाचा अभिनयही भन्नाट होता. पण ...

Renuka Dhaybar | Updated On: May 21, 2018 08:50 PM IST

लग्न नाही तर 'या' कारणामुळे दीपिकाकडे कोणताही नवीन सिनेमा नाही

21 मे : संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावत या सिनेमात दीपिकाने सगळ्यांचंच मन जिंकलं होतं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड तोडले. त्यात दीपिकाचा अभिनयही भन्नाट होता. पण मीडिया रिपोर्टनुसार सध्या दीपिका कोणत्याच सिनेमात काम करत नाही आहे.

पद्मावतनंतर दीपिकाने इरफान खानसोबत सपना दीदी हा सिनेमा साईन केला होता. पण इरफान आजारी असल्याने या सिनेमाची शुटिंग थांबवण्यात आली आहे. पण मग असं असताना दीपिकाला सिनेमाच्या ऑफर आल्या नाहीत असं होऊच शकत नाही. पण दीपिकानेच नवीन सिनेमा साईन करण्यास नकार दिला, असं सांगण्यात येत आहे.

असं बोललं जातंय की, खांदा आणि मानेच्या दुखण्यामुळे दीपिका नवीन सिनेमा साईन करत नाही आहे. अंग दुखीच्या या आजारामुळे तिने अनेक नवीन सिनेमे करण्यास नकार दिला. कारण अर्थात लग्नासाठी आपल्या करिअरमध्ये अंतर देणाऱ्यातली दीपिका तरी नाही.सध्या बॉलिवूडमध्ये दीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या चर्चा आहेत. आणि ते लवकरच लग्न करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. पण दीपिकाच्या चाहत्यांना आतूरता आहे ती तिच्या आगामी सिनेमाची. त्यामुळे दीपिकाच खरंच आजारी असेल तर ती लवकर बरी व्हावी आणि आपल्या अभिनयाची जादू पुन्हा चाहत्यांना दाखवावी ऐवढीच इच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2018 08:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close