राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा 'कच्चा लिंबू', तर हिंदीमध्ये 'न्यूटन'

65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज दिल्लीत घोषणा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या पुरस्कारांमध्ये मराठी शिलेदारांनी आपला झेंडा फडकता ठेवलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2018 03:16 PM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा 'कच्चा लिंबू', तर हिंदीमध्ये 'न्यूटन'

13 एप्रिल : 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज दिल्लीत घोषणा करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या पुरस्कारांमध्ये मराठी शिलेदारांनी आपला झेंडा फडकता ठेवलाय. यात अमित मसुरकर दिग्दर्शित न्यूटन हा सिनेमा सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा ठरलाय. तर प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू हा सिनेमा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरलाय.

याशिवाय सुयश शिंदे दिग्दर्शित मय्यत हा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरलाय. तर नागराज मंजुळेंचा पावसाचा निबंध या लघुपटालाही विशेष पुरस्कार जाहीर झालाय. याशिवाय मृत्युभोग या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर झालाय. यशराज कऱ्हाडेच्या 'म्होरक्या' या सिनेमाला विशेष उल्लेखनीय चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झालाय.

याशिवाय सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा पुरस्कार 'टॉयलेट एक प्रेम कथा'ला, तर सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार ए आर रेहमान याला जाहीर झालाय. तर सर्वोत्कृष्ट विज्युअल इफेक्ट्सचा पुरस्कार बाहुबली द कनक्लुजन या सिनेमाला जाहीर झालाय. तर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला मॉम या तिच्या अखेरच्या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झालाय.

हे पुरस्कार 3 मे रोजी दिल्लीमध्ये दिले जातील.

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा

Loading...

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - कच्चा लिंबू

सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - म्होरक्या

नर्गिस दत्त पुरस्कार (फीचर फिल्म) - ठप्पा - निपुण धर्माधिकारी

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - न्यूटन (निर्माता - अमित मसुरकर)

स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) - म्होरक्या - यशराज कऱ्हाडे

सर्वोत्कृष्ट संकलन - मृत्युभोग

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शॉर्ट फिल्म) - पावसाचा निबंध - नागराज मंजुळे

सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म (नॉन फीचर) - मयत - सुयश शिंदे

सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट - चंदेरीनामा- राजेंद्र जंगले

बॉलिवूडला पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी (मॉम)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - दिव्या दत्ता (इरादा)

सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर-  ए.आर. रहमान (मॉम)

सर्वोत्कृष्ट साहसी दृश्यं - अब्बास अली मोगल (बाहुबली 2)

सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- बाहुबली 2

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन - गणेश आचार्य (गोरी तू लाथ मार - टॉयलेट एक प्रेम कथा)

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - न्यूटन

स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) - अभिनेता पंकज त्रिपाठी (न्यूटन- हिंदी)

सर्वोत्कृष्ट गाणं - ए.आर. रहमान

स्पेशल मेन्शन (विशेष दखल) (फीचर फिल्म) - हेल्लो अर्सी (उडिया)- प्रकृती मिश्रा

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं पदार्पण - वॉटर बेबी - पिया शाह

सर्वोत्कृष्ट मानववंशशास्त्रावरील चित्रपट- नेम, प्लेस, अॅनिमल, थिंग

सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती - गिरीजादेवी डॉक्युमेंट्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 12:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...