सुशांतच्या कुकची पुन्हा झाली 6 तास चौकशी, बहिणीचाही दुसऱ्यांदा नोंदवला जाणार जबाब

सुशांतच्या कुकची पुन्हा झाली 6 तास चौकशी, बहिणीचाही दुसऱ्यांदा नोंदवला जाणार जबाब

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचा कुक नीरजची मुंबई पोलिसांनी तब्बल 6 तास चौकशी केली. पोलिसांनी त्याच्याकडे आत्महत्येच्या 3 दिवस आधीची अर्थात 11 ते 14 जून दरम्यानची सुशांतबाबतची सर्व माहिती विचारुन घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर आज महिना लोटला आहे. मात्र अद्याप सुशांतने आत्महत्या का केली याबाबत मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या हाती अद्याप कोणताही ठोस पुरावा लागला नाही आहे. अशावेळी अशी माहिती समोर येत आहे की, मुंबई पोलीस आता सुशांतचा आचारी नीरजची पुन्हा एकदा चौकशी करणार आहेत. आत्महत्येच्या 3 दिवस आधी सुशांतने नेमकं काय केले, काय खाल्ले यांसारख्या प्रत्येक सविस्तर माहिती पोलिसांनी या कुककडून मिळवली आहे.

सुशांतचा कुक नीरजची मुंबई पोलिसांनी तब्बल 6 तास चौकशी केली. पोलिसांनी त्याच्याकडे आत्महत्येच्या 3 दिवस आधीची अर्थात 11 ते 14 जून दरम्यानची सुशांतबाबतची सर्व माहिती विचारुन घेतली आहे. या दरम्यान सुशांतची कोणाशी बातचीत झाली ते त्याने काय खाल्ले याबाबतची माहिती नीरजला विचारण्यात आली. याचबरोबर अशी माहिती समोर येत आहे की, आज मंगळवारी सुशांतची बहिण मितूला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. पोलिसांकडून तिला 14 जून आधी 3 महिन्यापूर्वी झालेली सुशांतबरोबरची भेट, त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीबरोबरचे (Rhea Chakraborty) त्याचे संबंध, त्यांची भांडणं यासंदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात. सुशांतच्या बहिणीचा देखील जबाब दुसऱ्यांदा नोंदवला जाऊ शकतो.

(हे वाचा-धक्कादायक! तब्बल 5 दिवसांनी सापडला अभिनेत्रीचा मृतदेह, तलावात झाली होती बेपत्ता)

सुशांतला जाऊन आज एक महिना पूर्ण होत आहे. त्याच्या आठवणीत अनेकांनी त्याच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने देखील पहिल्यांदा सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. Child of God असं कॅप्शन देत तिने एका देवासमोर लावलेल्या दिव्याचा फोटो शेअर केला आहे. त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने देखील सोमवारी सुशांतबरोबरचे काही फोटो शेअर करत त्याच्याबद्दल भावुक पोस्ट शेअर केली आहे.

(हे वाचा-सुशांतच्या मृत्यूनंतर महिनाभराने अंकिता लोखंडेची सोशल मीडियावर पहिली पोस्ट)

(हे वाचा-रिया चक्रवर्ती पुन्हा ट्रोल, सुशांतच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच शेअर केले PHOTOS)

सुशांत सिंह राजपूतचा 'दिल बेचारा' हा सिनेमा या 24 जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक आणि कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाबरा-ज्यांनी सुशांतला 'काय पो छे'मधून बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता, त्यांनी देखील सुशांतसाठी खूप इमोशनल मेसेज पोस्ट केला आहे. 'आज तुला जाऊन एक महिना झाला, आता तर तू फोन पण करणार नाही...' अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 14, 2020, 1:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading