शाहरुख-करणमुळे 'डिअर जिंदगी'मध्ये झाली होती आलियाची एंट्री, अभिनेत्रीला केलं होतं रिप्लेस

शाहरुख-करणमुळे 'डिअर जिंदगी'मध्ये झाली होती आलियाची एंट्री, अभिनेत्रीला केलं होतं रिप्लेस

सोशल मीडियावर (Social Media) वर आलियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलिया स्वत: स्विकार करतेय की 'डिअर जिंदगी' या चित्रपटामध्ये एका दुसऱ्या अभिनेत्रीला रिप्लेस करून तिने एन्ट्री घेतली होती

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)च्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर नेपोटिझम (Nepotism) या विषयाने डोके वर काढले आहे. सोशल मीडियावर या घटनेनंतर अनेकांना ट्रोल करण्यात आले आहे. करण जोहर, महेश भट्ट त्याचप्रमाणे अनेक स्टार किड्सना यामध्ये ट्रोल केले गेले आहे. या दरम्यान सोशल मीडियावर आलिया भट्टचा 'डिअर जिंदगी' या चित्रपटाबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावरून ती पुन्हा एकदा ट्रोलिंगची शिकार बनली आहे.

सोशल मीडियावर (Social Media) वर आलियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आलिया स्वत: स्विकार करतेय की 'डिअर जिंदगी' या चित्रपटामध्ये एका दुसऱ्या अभिनेत्रीला रिप्लेस करून तिने एन्ट्री घेतली होती. काही दिवसांपूर्वी राजीव मसंद (Rajeev Masand) यांनी आलियाची मुलाखत घेतली होती. यामध्ये आलियाला एक प्रश्न विचारण्यात आला की, 'डिअर जिंदगी'मध्ये कोणत्या दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती का, ज्यानंतर शाहरुख आणि करण जोहरने मनवल्यामुळे गौरी शिंदेने या चित्रपटात आलियाला कास्ट केले.

(हे वाचा-'दिल बेचारा'चे टायटल ट्रॅक प्रदर्शित, हे गाणं ठरणार सुशांतचा शेवटचा डान्स)

या प्रश्नाचे उत्तर देताना आलियाने हे स्विकारले होते की, चित्रपटासाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड झाली होती. कोणाची निवड झाली होती, हे तिला माहित नसल्याचे तिने सांगितले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर आलियाला यानंतर ट्रोल्सना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे पूजा भट्टला देखील अनेक युजर सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.

(हे वाचा-विकास दुबेच्या एनकाउंटरनंतर ट्विटरवर रोहित शेट्टी ट्रेंड, वाचा काय आहे कारण)

डिअर जिंदगीसाठी कतरिना कैफच्या नावाची चर्चा होती. मात्र शाहरुख आणि करणने विनंती केल्यामुळे आलियाच्या नावाची वर्णी या चित्रपटात लागली, अशी माहिती समोर आली होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 10, 2020, 5:42 PM IST

ताज्या बातम्या