Home /News /entertainment /

सेलेना गोमेझला रणवीर सिंहने टाकलं मागे, Giphy वर 1.1 अब्ज VIEWS चा रेकॉर्ड

सेलेना गोमेझला रणवीर सिंहने टाकलं मागे, Giphy वर 1.1 अब्ज VIEWS चा रेकॉर्ड

रणवीरला Giphy च्या चॅनेलवर 1.1 बिलियन Views मिळाले आहेत. यामुळे रणवीरने 961 मिलियन लाइक्स मिळवणाऱ्या सेलेना गोमझ (Selena Gomez) ला मागे टाकले आहे.

    मुंबई, 16 जुलै : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) गेल्या काही वर्षांमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. तरुण-तरुणींमध्ये त्याची शैली विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या हटके लुक्समुळे तो नेहमी चर्रेत असतो. सोशल मीडियावर देखील त्याचा बोलबाला असतो. त्याच्याकडे एक युथ आयकॉन म्हणून पाहिलं जातं, मात्र आता त्याने हे सिद्ध देखील केले आहे. सोशल मीडियावर अनेक असे प्लॅटफॉर्म आहेत, ज्यावर चाहते त्यांच्या आवडत्या कलाकाराला फॉलो करतात. रणवीर सिंह अमेरिकेच्या प्रसिद्ध ऑनलाइन डेटाबेस आणि सर्च इंजिन Giphy वर देखील आहे. Giphy चा वापर Animated फोटो किंवा GIFs बनवण्यासाठी केला जातो. रणवीरला Giphy च्या चॅनेलवर 1.1 बिलियन Views मिळाले आहेत. यामुळे रणवीरने 961 मिलियन लाइक्स मिळवणाऱ्या सेलेना गोमझ (Selena Gomez) ला मागे टाकले आहे. (हे वाचा-सुशांतच्या आत्महत्येचं दुबईतील डॉनशी कनेक्शन? भाजप खासदाराची CBI चौकशीची मागणी) Giphy वर असा रेकॉर्ड बनवणारा रणवीर पहिला भारतीय आहे. रणवीर आता सर पॉल मॅक्कार्टनी, मेडोना, टेलर स्विफ्ट आणि एरियान ग्रँडे यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आयकॉन्सच्या पंगतीमध्ये जाऊन बसला आहे. याही कलाकारांच्या प्रोफाइलचे Views 1 बिलियन पेक्षा जास्त आहेत. सोशल मीडियावर रणवीर सिंहचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याने त्याच्या अभिनयनाच्या शैलीने आणि हटके अंदाजामुळे मोठ्या प्रमाणात यंगस्टर्सना आकर्षित केले आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रणवीर सिंहचे 56 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांबद्दल बोलायचे झाल्यास, इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सनुसार रणवीर सिंह टॉप 3 मध्ये आहे. (हे वाचा-अमित साद याचा धक्कादायक खुलासा; TV इंडस्ट्रीने बंदी आणली म्हणून...) रणवीर आता जागतिक स्तरावर ख्याती मिळवत आहे. त्याचे चाहते ग्लोबल स्तरावर वाढू लागले आहेत. त्याचे फॉलोअर्स अमेरिका, ब्रिटन, स्कॉटलंड, बांग्लादेश, म्यानमार, इंडोनेशिया, फ्रान्स, जर्मनी, अफगाणिस्तान, श्रीलंका, सिंगापुर, हाँगकाँग, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, यूएई, कॅनडा आणि जपान या देशात तर काही आफ्रिकी देशांमध्ये देखील आहेत.
    वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास रणवीर सिंह '83' या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये भारताने 1983 मध्ये जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकपची कहाणी आहे. माजी क्रिकेटपटू कपिल देवच्या भूमिकेत रणवीर दिसणार आहे. त्याच्याबरोबर तगडी स्टारकास्ट या सिनेमात दिसणार आहे. लग्नानंतर दीपिका पदुकोणबरोबरचा त्याचा हा पहिला चित्रपट असेल. त्याचप्रमाणे रणवीर रोहित शेट्टीचा चित्रपट 'सूर्यवंशी'मध्ये अजय देवगण आणि अक्षय कुमारबरोबर देखील दिसणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या