Home /News /entertainment /

पाकिस्तानी कलाकार म्हणतो, 'मैं शाहरुख खान हूँ', बायोपिकच्या चर्चेवरही दिलं उत्तर

पाकिस्तानी कलाकार म्हणतो, 'मैं शाहरुख खान हूँ', बायोपिकच्या चर्चेवरही दिलं उत्तर

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या जीवनातील काही घटनांपासून प्रेरित होऊन एक एक शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आहे. ही फिल्म लवकरच रिलीज होणार आहे.

    मुंबई, 20 मे : भारत-पाकिस्तानचे संबंध (India Pakistan Relation) फारसे चांगले नाहीत. पण, कला, चित्रपट आणि संगीताला भाषेचं किंवा इतर कोणतंही बंधन नसतं, असं म्हटलं जातं. त्यामुळे भारतीय चित्रपटांचे चाहते जसे पाकिस्तानमध्ये आहेत, तसेच पाकिस्तानी सीरिज आणि चित्रपटाचे चाहते भारतातही आहेत. या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाकिस्तानमध्ये बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या जीवनातील काही घटनांपासून प्रेरित होऊन  शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आहे. ही फिल्म लवकरच रिलीज होणार आहे. पाकिस्तानी फिल्म 'मैं शाहरुख खान हूँ' (Main Shahrukh Khan Hoon) असं या शॉर्ट फिल्मचं नाव आहे  यामध्ये अभिनेता मोहसीन अब्बास हैदर (Mohsin Abbas Haider) मुख्य भूमिकेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो शॉर्ट फिल्ममध्ये शाहरुख खानची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर मोहसीन अब्बास हैदर शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. याआधी, ही फिल्म शाहरुख खानचा बायोपिक असल्याची चर्चा होती, पण प्रत्यक्षात ही फिल्म एका अभिनेत्याची कथा आहे जो शाहरुख खानला फॉलो करतो आणि त्याचा खूप मोठा फॅन (Fan) आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहसीन या चित्रपटात पाच वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हा चित्रपट बघण्याचा आनंद घेता येणार आहे. इन्स्टाग्रामवर फिल्मचं पोस्टर शेअर करताना मोहसीनने लिहिलंय की, 'मी माझ्या आवडत्या 'मैं शाहरुख खान हूँ' या शॉर्ट फिल्मचं पोस्टर शेअर केलं आहे. या फिल्ममध्ये तुम्हाला मी 5 वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहे. ही शॉर्ट फिल्म (Short Film) करायला मिळावी हे कोणत्याही अभिनेत्याचं स्वप्न असू शकतं.’ दिशा पाटणीने गुपचूप केलं लग्न? VIDEO समोर आल्यावर नेटकरी विचारतायत 'आता टायगरचं काय होणार?' बायोपिक नाही हा चित्रपट शाहरुख खानचा बायोपिक आहे, या वृत्ताचे मोहसीनने एका संभाषणादरम्यान खंडन केलं होतं. ‘ही फिल्म शाहरुख खानवर बनलेला नाही. ही कथा सुपरस्टार (Superstar) बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिनेत्याची आहे. तो अभिनेता शाहरुख खानचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याच्या आयुष्यापासून खूप प्रेरित आहे,’ असं त्याने सांगितलं. 'मैं शाहरुख खान हूँ' या चित्रपटाचं दिग्दर्शन बद्र मेहमूद यांनी केलंय. मोहसीन अब्बास हैदर मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. अदनान आणि शकील हुसेन या चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित आहेत. या चित्रपटाबाबत पाकिस्तानी लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.
    First published:

    Tags: Bollywood News, Pakistan, Shah Rukh Khan

    पुढील बातम्या