दिल जीत लिया! गरीब महिलेला मदत करताना मलायकाचा फोटो VIRAL

दिल जीत लिया! गरीब महिलेला मदत करताना मलायकाचा फोटो VIRAL

मलायका अरोराचे फोटो बऱ्याचदा व्हायरल होतात. कधी अर्जून कपूरबरोबर, कधी हॉट अंदाजात तर कधी जिम लूकमध्ये मलायका दिसते. मात्र सध्या मलायकाचे असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत की ज्यामुळे नक्की तुम्ही तिच्या प्रेमात पडाल.

  • Share this:

मुंबई, 2 मार्च : बी टाऊन कलाकारांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. Paparazzi फोटोग्राफर्स या सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. त्यामुळे हे कलाकार पडद्यामागे कसं आयुष्य जगतात हे त्यांच्या फॅन्सना समजतं. Paparazzi कडून मलायका अरोराचे (Malaika Arora) फोटो बऱ्याचदा काढले जातात. कधी अर्जून कपूरबरोबर, कधी हॉट अंदाजात तर कधी जिम लूकमध्ये मलायका दिसते. मात्र सध्या मलायकाचे असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत की ज्यामुळे नक्की तुम्ही तिच्या प्रेमात पडाल.

अलीकडेच मुंबईमधील वांद्रे याठिकाणी ही 45 वर्षीय अभिनेत्री Paparazziच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डिनर डेटसाठी आलेली मलायका यावेळीही स्टनिंग अंदाजात दिसत होती. जेव्हा ती रेस्टॉरंटमधून बाहेर पडली तेव्हा एक गरीब बाई तिला काहीतरी विकत होती. मलायकाने यावेळी काही खरेदी केले की नाही ते अस्पष्ट आहे, परंतु त्या गरीब स्त्रीला पैसे देताना मलायका कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मलायकाच्या या कृतीमुळे तिने सोशल मीडियावर अनेकांची मनं जिंकली आहेत. याच घटनेच्या दुसऱ्या दिवशीही मलायका जिम लूकमध्ये फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यामध्ये स्पॉट झाली आहे. यावेळी ती पांढरा क्रॉपटॉप आणि राखाडी रंगाच्या शॉर्ट्समध्ये दिसली. यामध्ये तिचे स्टनिंग अॅब्स दिसत आहेत.

अर्जून कपूरबरोबर अनेकदा मलायका स्पॉट होते. रविवारी देखील एका रेस्टॉरंटबाहेर ती अर्जून बरोबर दिसली. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा कट-ड्रेस परिधान केला होता.

मलायकाचे फोटो नेहमी व्हायरल होत असले तरीही एका गरीब महिलेला मदत करताना व्हायरल झालेला फोटो अनेकांचं मन जिंकत आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

First published: March 2, 2020, 12:00 PM IST

ताज्या बातम्या