Home /News /entertainment /

एअर इंडियाच्या कारभारावर भडकली कृती, स्टाफला दिला शिष्टाचार शिकण्याचा सल्ला

एअर इंडियाच्या कारभारावर भडकली कृती, स्टाफला दिला शिष्टाचार शिकण्याचा सल्ला

एअर इंडिया (Air India)च्या फ्लाईटमधून प्रवास करताना कृती खरबंदाला एक वाईट अनुभव आला आणि याबाबत तिने ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. या ट्वीटमध्ये तिने एअर इंडिया टॅग करत उपहासात्मक पद्धतीने त्यांचे आभार मानले आहेत.

    मुंबई, 22 फेब्रुवारी : बॉलीवूडमधील कलाकारांना शूटनिमित्त किंवा इतर कामानिमित्त वारंवार प्रवास करावा लागतो. अशावेळी हे कलाकार फ्लाईट्सचा वापर करतात. अनेकदा या कलाकारांना एअरलाइन सर्व्हिसेसच्या बेपर्वाईचा सामना करावा लागतो. असाच अनुभव अभिनेत्री कृती खरबंदाला आल्याचं पाहायला मिळालं. एअर इंडिया (Air India)च्या फ्लाईटमधून प्रवास करताना कृतीला एक वाईट अनुभव आला आणि याबाबत तिने ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. या ट्वीटमध्ये तिने एअर इंडिया (Air India) टॅग करत उपहासात्मक पद्धतीने त्यांचे आभार मानले आहेत. तर झालं असं की एअर इंडियाच्या फ्लाईटमधून प्रवास करताना कृती खरबंदाचं सामान हरवलं. त्यामुळे वैतागलेल्या कृतीने ट्वीट करून तिचा राग व्यक्त केला आहे. कृती आपल्या ट्वीटमध्ये म्हणते आहे की, ‘डिअर एअर इंडिया, पुन्हा एकदा माझं सामान हरवण्यासाठी धन्यवाद. आणि तुम्हाला तुमच्या स्टाफला काही शिष्टाचार शिकवणं गरजेचं आहे.’ कृतीने केलेल्या ट्वीटला हजारो लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी आपल्या तक्रारी देखील कृतीचं ट्वीट रिट्वीट करत मांडल्या आहेत. (हेही वाचा-‘ Great! ’, आयुष्मानच्या शुभ मंगल ज्यादा सावधाननं डोनाल्ड ट्रम्पनाही लावलं याड) कृतीच्या ट्वीटला एअर इंडियाने सुद्धा काही वेळातच रिप्लाय देत तिची समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. एअर इंडियाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘कृपया, आम्हाला माफ करा. आम्हाला तुमचा फाइल रेफरन्स नंबर आणि बॅगेज टॅग नंबर पर्सनल मेसेजमध्ये पाठवा. त्याचप्रमाणे तुमच्या फ्लाईट्सचे सुद्धा डिटेल्स पाठवा, जेणेकरून आम्ही बॅगेज सांभाळणाऱ्या टीमसोबत याप्रकरणाची चौकशी करू’. एअर इंडियाच्या या रिप्लायवर क्रिती आणखी भडकल्याचं पाहायला मिळालं. तिने आणखी एक ट्वीट करत एअर इंडियाला झापलं आहे. ती या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाली की, ‘मी तुमची माफी स्वीकार तर करू इच्छिते, पण मला माझ्या बॅगेचा काहीही पत्ता नाहीये. त्याचप्रमाणे तुमच्या मुंबई आणि गोव्यातील एअरपोर्ट टीमला एवढंही तारतम्य नाही आहे की माझ्याबरोबर यासंदर्भात बोलावं आणि मला अपडेट द्यावेत.’ (हेही वाचा- अरे देवा! रणबीरची EX होणार त्याची 'आई'? वाचा काय आहे भानगड) त्यानंतर पुन्हा एकदा एअर इंडियाने ट्वीट करत कृतीचं बॅगेज नेमकं कुठपर्यंत पोहोचलं आहे, याची माहिती दिली. 2014 मध्ये देखील क्रितीने सोशल मीडियावर एअर इंडियाबाबत तक्रार केली होती. केंपएगोडा इंटरनॅशनल एअरपोर्टवर एअर इंडियाच्या स्टाफकडून तिच्याबरोबर गैरवर्तन झाल्याचा दावा कृतीने केला होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या