Home /News /entertainment /

सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोलिंगमुळे पूर्णपणे खचला करण जोहर, रडूही कोसळलं; जवळच्या मित्राचा खुलासा

सुशांतच्या आत्महत्येनंतर ट्रोलिंगमुळे पूर्णपणे खचला करण जोहर, रडूही कोसळलं; जवळच्या मित्राचा खुलासा

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझम या विषयावरून स्टार किड्सबरोबरच फिल्ममेकर करण जोहर (Karan Johar) देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.

    मुंबई, 07 जुलै : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh Rajput)च्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर नेपोटिझम (Nepotism) या विषयावर मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाला आहे. यामध्ये स्टार किड्सबरोबरच फिल्ममेकर करण जोहर (Karan Johar) देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला. त्यावर सोशल मीडिया युजर्सनी त्याचबरोबर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील टीका केली आहे. दरम्यान करणच्या एका जवळच्या मित्राने अशी माहिती दिली आहे की, 'सुशांतच्या आत्महत्येने करण पुरता हादरून गेला होता, त्यानंतर त्याला ट्रोल केल्यामुळे तर तो पूर्णपणे खचला देखील होता, तो रडत होता.' सुशांतच्या निधनानंतर करणने सोशल मीडियावर त्याच्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. मात्र सोशल मीडियावर कायम सक्रीय राहणाऱ्या करणने त्यानंतर कोणतीच पोस्ट शेअर केली नाही. त्यानंंतर त्याचे फॉलोअर्स कमी झाल्याचे देखील काही मीडिया अहवालांनी सांगितले आहे. बॉलिवूड हंगामाच्या एका अहवालानुसार करणच्या एका खास मित्राने त्याच्या परिस्थितीचा खुलासा केला आहे. (हे वाचा-खरा हिरो! भर पावसात वर्सोवा बीच साफ करण्यासाठी पालिकेच्या मदतीला आला रणदीप हुडा) त्याने अशी माहिती दिली की, करण पूर्णपणे कोलमडला आहे. ट्रोल्सबद्दल बोलायचे झाले तर याआधी तो कधी या गोष्टींमुळे प्रभावित झाला नव्हता, जितका सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर झाला आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगचा त्याच्यावर खूप वाईट परिणाम झाला आहे.' या मीडिया अहवालानुसार करण जोहर तणावग्रस्त आहे, कारण त्याच्या जवळच्या लोकांना ट्रोलिंगची शिकार व्हावे लागत आहे. त्याचप्रमाणे त्याच्या जुळ्या मुलांना मारण्याची धमकी देखील येत आहे. (हे वाचा-बॉलिवूडला आणखी एक धक्का! ज्येष्ठ निर्मात्याचे मुंबईत निधन) दरम्यान सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सोमवारी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची वांद्रे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यांचा जबाब सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी नोंदवण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी सुशांत सिंग सोबत 4 चित्रपट  करण्याचा विचार करत होते. तारखांच्या गडबडींमुळे आणि इतर काही कारणांमुळे सुशांत हे चित्रपट करू शकला नाही. यासंदर्भात त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. आतापर्यंत 30 पेक्षा अधिक जणांचा जबाब या प्रकरणी नोंदवण्यात आला आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bollywood, Karan Johar, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या