मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Kriti Sanon साकारणार मीना कुमारी; बॉलिवूडच्या या Tragedy Queen च्या बायोपिकचे कोण करणार दिग्दर्शन?

Kriti Sanon साकारणार मीना कुमारी; बॉलिवूडच्या या Tragedy Queen च्या बायोपिकचे कोण करणार दिग्दर्शन?

काही दिवसांपूर्वीच माहिती समोर आली होती, की मीना कुमारी (Meena Kumari Biopic) यांच्यावर बनत असलेल्या बायोपिकमध्ये (Meena Kumari Biopic actress) अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon to play Meena Kumari) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शकाबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे

पुढे वाचा ...

मुंबई, 09 एप्रिल: काही दिवसांपूर्वीच माहिती समोर आली होती, की मीना कुमारी (Meena Kumari Biopic) यांच्यावर बनत असलेल्या बायोपिकमध्ये (Meena Kumari Biopic actress) अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon to play Meena Kumari) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान याबाबत आता एक नवीन अपडेट समोर आले आहे. हा सिनेमा ज्या अभिनेत्रीवर बनणार आहे, ती बॉलिवूडमधील एक ताकदीची-कसलेली अभिनेत्री होती. त्यामुळे त्यांच्यावर बनत असणाऱ्या बायोपिकचा दिग्दर्शकही तितक्याच ताकदीचा हवा. मीडिया अहवालानुसार या सिनेमाचं दिग्दर्शन हंसल मेहता (Hansal Mehta to direct Meena Kumari Biopic) करणार आहे. हंसल मेहता यांनी 'शाहिद', 'अलीगढ', 'ओमेर्टा' तसंच 'छलांग' यांसारखे दर्जेदार चित्रपट बनवले आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'स्कॅम 1992' या वेबसीरिजचे देखील विशेष कौतुक झाले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सीरिजने प्रेक्षकांची आणि समीक्षकांचीही मनं जिंकली आहेत.

हे वाचा-अमिताभ नाही तर धर्मेंद्र यांच्यावर होतं प्रेम, Sholay मधील 'राधा'चा खास किस्सा

ETimes ने दिलेल्या वृत्तानुसार, सूत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, 'हंसल यांनी 'शाहिद', 'अलिगढ', 'ओमेर्टा' आणि 'छलांग' सारखे प्रशंसित चित्रपट केले आहेत आणि निर्मात्यांना वाटते की मीना कुमारी यांच्या बायोपिकसाठी ते योग्य आहेत.'

View this post on Instagram

A post shared by Hansal Mehta (@hansalmehta)

मीडिया अहवालानुसार, क्रिती सेनॉनबद्दल बोलायचे झाले तर मीना कुमारी यांच्या बायोपिकसाठी तिने अद्याप अंतिम स्वाक्षरी केलेली नाही. अर्थात तिने कोणतेही कॉन्ट्रॅक्ट साइन केल्याची अधिकृत माहिती नाही.

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

'मिमी'च्या यशानंतर क्रितीकडे देखील एक वैविध्यपूर्ण भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. 'बच्चन पांडे'मधील तिच्या कामाचेही कौतुक झाले. या यशस्वी भूमिकांनंतरच तिसा हा सिनेमा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जर तिने या चित्रपटासाठी होकार दिला असल्यास ती मीना कुमारी यांची भूमिका कशी निभावते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान या प्रोजेक्टबाबत अजून कोणतेही सविस्तर तपशील समोर आलेले नाहीत.

हे वाचा-फक्त इम्रान हाश्मीच नव्हे तर या कलाकारांशीसुद्धा आहे आलियाचं फॅमिली कनेक्शन

अभिनेत्री क्रिती सेनॉन प्रभास स्टारर 'आदिपुरुष'मध्ये सीता तर टायगर श्रॉफसह गणपत सिनेमात दिसणार आहे. वरुण धवनसह तिचा 'भेडिया' हा सिनेमा देखील येत आहे. याशिवाय ती कार्तिक आर्यनसह 'शहजादा' सिनेमात दिसणार आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Kriti sanon