मुंबई, 23 ऑक्टोबर : न्यायपालिकेविरूद्ध 'दुर्भावनायुक्त आणि अपमानजनक' ट्वीट पोस्ट केल्याचा आरोप करत अभिनेत्री कंगना रणौत हिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील स्थानिक कोर्टाच्या आदेशानंतर शहरातील वकिलाने गुरुवारी ही फौजदारी तक्रार दाखल केली. यापूर्वी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशावरून तिच्याविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कंगना रणौत आणि तिच्या बहिणीला पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावले आहे. एकंदरित पुन्हा एकदा मुंबई पोलीस VS कंगना रणौत अशी परिस्थिती येणाऱ्या काळात पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
अंधेरी कोर्टात अभिनेत्रीविरोधात वकील वकील अली कासिफ खान देशमुख यांनी देशद्रोह आणि तिच्या ट्वीट्समधून धार्मिक समुहांमध्ये वाद निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीमध्ये असे म्हणण्यात आले आहे की, ही बॉलिवूड अभिनेत्री भारतातील विविध समुदाय, कायदा आणि अधिकृत सरकारी संस्था यांचा आदर करत नाही आणि तिने न्यायपालिकेची खिल्ली उडवली आहे.
(हे वाचा-46 व्या वर्षीही हॉट दिसणारी मलायका प्रत्यक्ष आयुष्याही आहे तितकीच बोल्ड)
तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, वांद्रे कोर्टाद्वारे मुंबई पोलिसांना कंगनाविरोधात तक्रार करण्याचे आदेश दिल्यानंतर कंगनाने न्यायपालिकेविरूद्ध 'दुर्भावनायुक्त आणि अपमानजनक' ट्वीट पोस्ट करत 'पप्पू सेना' म्हटले होते. अंधेरी न्यायालयामध्ये याप्रकरणी 10 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
Obsessed penguin Sena ... Pappupro of Maharashtra, bahut yaad aati hai k-k-k-k-k-Kangana, koi baat nahin jaldi aa jaungi .... https://t.co/nwLyoq1J2i
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 21, 2020
बॉलिवूडचे कास्टिंग डायरेक्टर आणि 'फिटनेस ट्रेनर' मुनव्वर अली सय्यद यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याची दखल घेत वांद्रे दंडाधिरारी न्यायालयाने कंगनाविरूद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होत. तक्रारीमध्ये कंगनाने आणि तिच्या बहिणीने केलेल्या ट्वीटचा हवाला देण्यात आला आहे.
(हे वाचा-PHOTO: एकेकाळी ब्रेस्ट सर्जरी करायला नव्हते पैसे, अन् रातोरात झाली स्टार)
मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहिण रंगोली चंदेल यांना बुधवारी समन जारी चौकशीकरता बोलवले आहे. तिच्या वक्तव्यातून दोन समाजात दुही निर्माण केल्याचा आरोप अभिनेत्रीवर केला जात आहे. अभिनेत्री कंगना तिच्या भावाच्या लग्नात आनंद साजरा करत असतानाच तिला ही नोटीस मिळाली आहे. यावेळी देखील तिने तिच्या अंदाजात उत्तर दिले आहे. तिने मुंबई पोलिसांना 'महाराष्ट्राचे पप्पू' म्हटले आहे. कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांना उत्तर दिले आहे.
तिने ट्वीट करून असे म्हटले आहे की, 'वेडसर झालेली पेंगविन सेना, महाराष्ट्राच्या पप्पूनो.. खूप आठवण येते आहे क-क-क-क-क कंगनाची, काही हरकत नाही लवकरच परत येईन.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kangana ranaut, Mumbai police