मुंबई, 1 जुलै- बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) मोठ्या चर्चेत आली होती. तिच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. रिया आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. गेल्यावर्षीपासून सोशल मीडियापासून दूर असलेली रिया आत्ता हळूहळू सोशल मीडियावर सक्रीय होतं आहे. अलीकडे ती फोटो आणि व्हिडीओ शेयर करून स्वतःला अपडेट ठेवत आहे. आज वाढदिवसाचं निमित्त साधत तिने सोशल मीडियावर एका मदतीसाठी आवाहन केलं आहे. मात्र यामुळे युजर्स मोठ्या प्रमाणात तिला ट्रोल (Trolle) करू लागले आहेत.
View this post on Instagram
रिया चक्रवर्तीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका छोट्याशा बाळाचा व्हिडीओ शेयर करत, त्याच्यासाठी मदतीचं आवाहन केलं आहे. हा मुलगा केवळ 1 वर्षांचा आहे. तो एक दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. त्या छोट्याशा बाळाला जेनेटीक डीसऑर्डरनं ग्रासलं आहे. त्याला एका खास औषधाची आवश्यकता आहे. रियाची ही पोस्ट पाहून काही युजर्स तिला ट्रोल करत आहेत.
(हे वाचा: HBD: VJ ते बॉलिवूड अभिनेत्री; असा होता रिया चक्रवर्तीचा अभिनय प्रवास)
रियाने या व्हिडीओमध्ये स्वतः त्या मुलाच्या आजाराबद्दल सांगितलं आहे. रियाने म्हटलं आहे की, त्या बाळाला एका खास औषधाची गरज आहे. आणि त्याची किंमत तब्बल 16 कोटी रुपये इतकी आहे. त्याचबरोबर रियाने युजर्सना मदतीचं आवाहन देखील केलं आहे.
(हे वाचा:HBD: 8 वर्षांपूर्वी सुशांतला पहिल्यांदा भेटली होती रिया; वाचा त्या भेटीबद्दल )
रियाने हा व्हिडीओ शेयर करताच, तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल व्हाव लागत आहे. काही युजर्सनी ट्रोल करत म्हटलं आहे, ‘हे सर्व करून तुझी इमेज चांगली नाही होऊ शकत’. तर दुसऱ्या युजर्सने म्हटलं आहे, ‘त्या बाळाचा आधार घेऊन रियाला स्वतःला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे’. तर अजून एका युजर्सने कमेंट्स करत रियाला ‘सिम्पथी क्वीन’ म्हटलं आहे. रिया चक्रवर्ती आज आपला 29 वा वाढदिवस साजरा करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Rhea chakraborty