नवाजुद्दीननं चक्क मराठीत शेअर केली पोस्ट!

नवाजुद्दीननं चक्क मराठीत शेअर केली पोस्ट!

नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिक सिनेमावर काम करतोय हे तर सगळ्यांनाच माहितीये.अभिजीत पानसे दिग्दर्शित या सिनेमाचं शूटिंग मागेच संपलं मात्र आता नवाजने या सिनेमाच्या डबिंगला सुरूवात केलीय.

  • Share this:

मुंबई, 5 आॅक्टोबर : नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिक सिनेमावर काम करतोय हे तर सगळ्यांनाच माहितीये.अभिजीत पानसे दिग्दर्शित या सिनेमाचं शूटिंग मागेच संपलं मात्र आता नवाजने या सिनेमाच्या डबिंगला सुरूवात केलीय. नुकतीच त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चक्क मराठीत 'माझ्या समस्त भावांनो आणि भगिनींनो...आजपासून डबिंगची सुरूवात केलीय,' अशी पोस्ट टाकलीय. त्याची ही पोस्ट वाचून बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

एका मुलाखतीत नवाजुद्दीननं हे स्पष्ट केलं. तो बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारतोय. त्याचं शूटिंग सुरू आहे. तो म्हणतो, ' बाळासाहेब धाडसी होते. त्यांची भूमिका करताना ते धाडस माझ्यात आलंय. मी माझ्या बायकोला घाबरत नाही. आता मी घरी बायकोशी वरच्या पट्टीत बोलू शकतो.'

त्यानं आपल्या बायकोची सीडीआर काढली. तेव्हा ही गोष्टही समोर आली की नवाजुद्दीन आपल्या बायकोला वैतागलाय. म्हणूनच त्यानं आपल्या वकील रिझवान सिद्दीकीकडून आपल्या बायकोची सीडीआर काढली होती. ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या तपासात हे समोर आलं होतं. पण आता परिस्थिती पूर्ण बदललीय. नवाज आपल्या बायकोला अजिबात घाबरत नाही.

23 जानेवारी 2019ला हा सिनेमा रिलीज होईल. संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय अभिजीत पानसेनं.

या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी नवाजुद्दिन सिद्दिकीने बरीच मेहनत घेतल्याचं या दिसतंय.  सफेद कुर्त्यामध्ये गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, डोळ्यांवरील चष्मा, डोक्यावरील केसांची स्टाईल, हातांची लकब हे सर्व काही बाळासाहेबांसारखंच पाहायला मिळतंय. नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडचा कसलेला अभिनेता आहे. त्यांनाही बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी मेहनत घेतल्याचं फोटोमध्ये दिसतंय.

जेव्हा 'मणिकर्णिका'वर केला जातो चोरीचा आरोप

First published: October 5, 2018, 3:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading