• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • नात नव्या नवेलीनं आजी जया बच्चनबद्दल व्यक्त केलं प्रेम; फोटोमध्ये दिसलं खास बॉन्डिंग

नात नव्या नवेलीनं आजी जया बच्चनबद्दल व्यक्त केलं प्रेम; फोटोमध्ये दिसलं खास बॉन्डिंग

बॉलिवूड (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bchchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Nvya Naveli Nanda) भलेही ग्लॅमरस दुनियेत काम करत नसली तरी नेहमीच चर्चेत असते.

 • Share this:
  मुंबई, 10 नोव्हेंबर- बॉलिवूड  (Bollywood)  महानायक अमिताभ बच्चन  (Amitabh Bchchan) आणि जया बच्चन  (Jaya Bachchan)  यांची नात नव्या नवेली नंदा  (Nvya Naveli Nanda)  भलेही ग्लॅमरस दुनियेत काम करत नसली तरी नेहमीच चर्चेत असते. नव्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. नव्या सोशल मीडियावर तिच्या पोस्ट्सद्वारे नेहमीच प्रसिद्धी मिळवत असते. नुकताच तिने आज्जी जया बच्चन यांच्यासोबत एक हृदयस्पर्शी गोंडस फोटो शेअर केला आहे. जो लोकांना खूप पसंत पडत आहे. फोटोमध्ये आजी आणि नातवाचे प्रेम नजरेसमोर येत आहे.
  नव्या नवेली नंदा तिचे आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासारखंच इंस्टाग्रामवर कुटुंबाचे नवीन आणि न पाहिलेले फोटो पोस्ट करत असते. नुकताच शेअर केलेल्या फोटोत ती आजीसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये जया बच्चनने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची साडी घातली आहे. तर नव्याने पिवळ्या रंगाचा सलवार सूट घातला आहे. नव्या खुल्या केसांमध्ये खूपच छान दिसत आहे. दोघीही एकमेकांकडे मोठ्या प्रेमाने बघत आहेत. हा फोटो दिवाळीचा असल्याचं लक्षात येत आहे.
  नव्या आणि जया यांच्या या सुंदर फोटोला चाहतेही लाईक आणि कमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.फोटोत आजी आणि नातवाचे बॉन्डिंग स्पष्टपणे दिसत आहे. फोटो शेअर करताना नव्याने कॅप्शनमध्ये काहीही लिहिलेले नाही. पण अशी अनेक फोटो आहेत, त्यांच्याबद्दल काहीही न लिहिता बरेच काही सांगून जाते, असाच हा फोटो आहे. नव्याने तिच्या आजीसोबतचा फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने अनेकदा फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोतही तुम्ही नात आणि आजीचे प्रेम पाहू शकता. यामध्ये तिने कॅप्शनमध्ये फक्त 'नानी'(आज्जी) असे लिहिले आहे.
  नव्या ही तिचे आजोबा अमिताभ बच्चन यांच्या खूप जवळ आहे. या फोटोमध्ये तुम्ही त्यांचे बॉन्डिंग पाहू शकता.संपूर्ण बच्चन कुटुंब दिवाळीच्या निमित्ताने एकत्र होते. ज्याचा फोटो मेगास्टारने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला होता. अमिताभ बच्चन, जया, ऐश्वर्या, अभिषेक, आराध्या आणि श्वेता नंदा यांची दोन मुलं नव्या आणि अगस्त्यही फोटोत होते. बच्चन कुटुंबाचा फोटो लोकांना चांगलाच आवडला होता.
  Published by:Aiman Desai
  First published: