अक्षय कुमारचा 'LAXMII' पुन्हा वादात, प्रदर्शनाच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर ट्रोल

अक्षय कुमारचा 'LAXMII' पुन्हा वादात, प्रदर्शनाच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर ट्रोल

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) स्टारर मोस्ट अवेटेड सिनेमा 'लक्ष्मी (Laxmii)' उद्या ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. मात्र अद्यापही या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळेल हे सोशल मीडियवरील प्रतिक्रियांवरून सांगता येत नाही आहे.

  • Share this:

मुंबई, 08 नोव्हेंबर: खिलाडीकुमार अक्षय (Akshay Kumar) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर 'लक्ष्मी' (Laxmii) उद्या अर्थात 9 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित होणे 'New Normal' असल्याने हा चित्रपट देखील असाच प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनाच्या एक दिवस आधी देखील सोशल मीडियावर या सिनेमाबाबत संताप पाहायला मिळत आहे. या सिनेमाच्या नावावरून वादंग उठला होता, नाव बदलल्यानंतरही लोकांमध्ये संताप कायम आहे.

ट्विटरवर तीव्र प्रतिक्रिया

दिवाळी दरम्यान प्रदर्शित होणाऱ्या अक्षयच्या या सिनेमाचे नाव 'लक्ष्मी बाँब' (Laxmii Bomb) असे ठेवण्यात आले होते. मात्र सोशल मीडियावर अनेकांनी याला विरोध केला, काहींनी प्रदर्शन करण्याचा इशारा दिला, सिनेमा बॉयकॉट करण्याची मागणीही झाली. त्यानंतर या सिनेमाचे नाव 'लक्ष्मी' करण्यात आले. विरोध करणाऱ्यांच्या मते 'लक्ष्मी' हे हिंदू देवतेचे नाव असल्यामुळे त्यापुढे 'बाँब' असा शब्द वापरणे अनुचित आहे. त्यामुळे या सिनेमाच्या बॅनची मागणी केली जात होती. अद्यापही याबाबत काहीजण विरोध करत आहेत. सोशल मीडियावर अशा उमटत आहेत प्रतिक्रिया-

या सिनेमामध्ये 'लव्ह जिहाद'चा प्रचार होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. यामध्ये अक्षय कुमार एका मुस्लिम कुटुंबातील मुलाची तर कियारा एका हिंदू कुटुंबातील मुलीची भूमिका साकारत आहे.

(हे वाचा-शोविक चक्रवर्तीने तिसऱ्यांदा दाखल केली जामीन याचिका, SCच्या निर्णयाचा दिला हवाला)

अक्षय कुमारचे आणखी काही प्रोजेक्ट काही महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. पुढच्या महिन्यात जानेवारीमध्ये अक्षयचा 'बच्चन पांडे' या सिनेमाचे शूटिंग सुरू होत आहे आणि हे शूटिंग मार्चपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. फरहाद समजी दिग्दर्शित या सिनेमामध्ये एक अभिनेत्री कृती सॅनन असणार आहे तर आणखी एका अभिनेत्रीचं नाव अद्याप समोर आले नाही आहे. हा सिनेमा साजिद नाडियाडवाला प्रोड्यूस करत आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 8, 2020, 12:50 PM IST

ताज्या बातम्या