Home /News /entertainment /

'कुली नंबर 1'ची रिलीज डेट ठरली ! घरबसल्या पाहा कॉमेडी आणि रोमान्सचा डबल धमाका

'कुली नंबर 1'ची रिलीज डेट ठरली ! घरबसल्या पाहा कॉमेडी आणि रोमान्सचा डबल धमाका

1995 मध्ये गोविंदाच्या तुफान कॉमेडीमुळे सुपरहिट झालेला कुली नंबर 1 सिनेमा आठवतोय? तोच सिनेमा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  मुंबई, 27 नोव्हेंबर: बहुप्रतीक्षित कुली नं. 1 चित्रपटाचा रिमेक ख्रिसमसच्या दिवशी 25 डिसेंबर 2020 ला रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होत आहे. 28 नोव्हेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचे लक्षवेधक पोस्टर रिलीज करण्यात आले असून, वरुण धवन (Varun Dhawan), सारा आली खान (Sara Ali Khan) असलेल्या या चित्रपटात काय धमाल असेल याची कल्पना यावरून येत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये वरुण धवन वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये दिसत आहे, तर सारा अली खान मराठमोळ्या मुलीच्या वेशात दिसत आहे. वरुण आणि सारा यांची केमिस्ट्री बघण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 1995 मध्ये गोविंदा आणि करिष्मा कपूर यांच्या भूमिका असलेला कुली.नं. 1 हा डेव्हिड धवन दिग्दर्शित चित्रपट आला होता. गोविंदाने अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा दाखवून भूमिकेमध्ये धमाल उडवून दिली होती. गोविंदा आणि करिश्माचा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. लोकप्रियतेचे उच्चांक या चित्रपटाने गाठले होते. गोविंदा आणि करिश्माची केमिस्ट्री रसिकांना भावली होती. अशा या चित्रपटाचा रिमेक बघण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. रिमेकमध्ये वरुण आणि सारा तीच जादू करणार का याची प्रतीक्षा रसिकांना आहे. डेव्हिड धवन यांनीच याचेही दिग्दर्शन केले आहे.
  सारा अली खानने ‘एन्टरटेनमेंट की सॉलिड शुरुआत, कुली नं वन से फर्स्ट मुलाकात ...28 नोव्हेंबरला 12 वाजता अॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या  फेसबुक आणि युट्यूब पेजवर या चित्रपटाचा ट्रेलर जरूर बघा....’ अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकली आहे. सारा आणि वरुण धवन सध्या मुंबई आणि आसपासच्या भागात या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. त्यावेळचे काही फोटो, व्हिडिओही इन्स्टाग्रामवर दिसत आहेत. त्यांना चाहत्यांचे भरभरून लाईक्स मिळाल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मे महिन्यात रिलीज होणारा ‘कुली नं वन’ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला. अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होत आहे. परेश रावल, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे विनोदाचे बादशाहदेखील या चित्रपटात आहेत. लोकही आता मनोरंजनासाठी हलक्या फुलक्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोना संकटामुळे मरगळलेल्या लोकांच्या मनाला हा चित्रपट नवीन उभारी देणारा ठरू शकतो.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या