मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Rohini Hattangadi B'day Special: International सिनेमात काम करणाऱ्या पहिल्या मराठमोळ्या अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांचा आज 67 वा वाढदिवस

Rohini Hattangadi B'day Special: International सिनेमात काम करणाऱ्या पहिल्या मराठमोळ्या अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी यांचा आज 67 वा वाढदिवस

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने त्यांनी कामाचा ठसा उमटवलाय.

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने त्यांनी कामाचा ठसा उमटवलाय.

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने त्यांनी कामाचा ठसा उमटवलाय.

मुंबई, 11 एप्रिल: ज्येष्ठ मराठी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने त्यांनी कामाचा ठसा उमटवलाय, त्यामुळे त्यांचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. रोहिणी हट्टगंडी हे अभिनयविश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी हिंदी आणि मराठीत एकापेक्षा एक सरस चित्रपट केले आहेत. प्रेक्षकांच्या आवडत्या असणाऱ्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi Birthday) यांचा आज 67वा वाढदिवस आहे.

रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म 11 एप्रिल 1955 रोजी पुण्यात झाला. त्यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड आपण अभिनेत्रीच व्हायचं हे आधीच ठरवलं होतं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोहिणी हट्टंगडी यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (NSD) प्रवेश घेतला. यासोबतच त्यांनी शास्त्रीय नृत्य कथकली आणि भरतनाट्यमही शिकलं. रोहिणी हट्टंगडी यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास त्यांनी गांधी, सारांश, पार्टी, अग्निपथ, अर्थ आणि पुकार यासह अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. मुन्नाभाई एमबीबीएसमध्येही त्यांनी संजय दत्तच्या आईची भूमिका साकारली होती.

खासगी आयुष्य

घातक आणि चालबाज यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या दमदार अभिनयासाठीही त्या ओळखल्या जातात. रोहिणी हट्टंगडी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे बॅचमेट असलेल्या जयदेव हट्टंगडी यांच्याशी लग्न केलं. मात्र, 2008 मध्ये जयदेव हट्टंगडी यांचं कर्करोगाने निधन झालं. या दोघांना असीम हट्टंगडी नावाचा मुलगा असून तो देखील बॉलिवूड इंडस्ट्रीत (Bollywood Industry) काम करतो. दरम्यान, जयदेव यांच्याशी लग्न केल्यानंतर रोहिणी हट्टंगडी यांनी त्यांच्या पतीसोबत मराठी नाट्यसमूह स्थापन केला. याअंतर्गत 150हून अधिक नाटकं सादर केली गेली.

करिअर

कालांतराने रोहिणी हट्टंगडी यांनी हळूहळू टीव्हीवर पदार्पण केले आणि 1978 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सईद अख्तर मिर्झा निर्मित अरविंद देसाई यांचा 'अजीब दास्तान' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. 1982 मध्ये प्रदर्शित झालेला 'गांधी' हा त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट (International Movie) होता. या चित्रपटाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. रोहिणी हट्टंगडी या पहिल्या अभिनेत्री आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटांत काम केलं आहे. तसेच तेव्हा बाफ्टा अवॉर्ड (Bafta Award) जिंकणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव अभिनेत्री होत्या.

पुरस्कारांबद्दल बोलायचं झाल्यास रोहिणी हट्टंगडी यांनी त्यांच्या कारकिर्दीत दोन फिल्मफेअर (Filmfare) आणि एक राष्ट्रीय पुरस्कार (National Award) पटकावला आहे. याशिवाय रोहिणी यांना 'गांधी' चित्रपटासाठी सहाय्यक भूमिकेसाठी बाफ्टा पुरस्कारही मिळाला आहे. आतापर्यंत त्यांनी 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि प्रत्येक चित्रपटासाठी त्यांचं कौतुक झालंय.

त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Marathi actress