या चिमुकलीला ओळखलं का? आज फक्त मराठी, हिंदीच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

या चिमुकलीला ओळखलं का? आज फक्त मराठी, हिंदीच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

मराठमोळी मुलगी आज एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी, हिंदी, तमिळ आणि बंगालीचं नव्हे, तर चक्क हॉलिवूडमध्ये सुद्धा तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मे-  मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Aapte) आज एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मराठी, हिंदी, तमिळ आणि बंगालीचं नव्हे, तर चक्क हॉलिवूडमध्ये सुद्धा तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. राधिकाचं हे उत्तुंग यश पाहून अनेकांच्या भुवया उंचावतात. ही अष्टपैलू अभिनेत्री आपल्या बालपणी सुद्धा इतकीच सुंदर आणि गोंडस होती.

View this post on Instagram

A post shared by Radhika (@radhikaofficial)

राधिका सतत आपल्या बालपणींच्या आठवणींना उजाळा देत असते. ती सतत आपले बालपणीचे फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram Post) शेयर करत असते. काही दिवसांपूर्वीचं राधिकाने आपला बालपणीचा फोटो शेयर केला होता. यामध्ये ती आपल्या वडीलांसोबत दिसून येत आहे. यामध्ये राधिकाचा लाडका डॉगी सुद्धा आहे.

View this post on Instagram

A post shared by Radhika (@radhikaofficial)

मराठमोळ्या राधिका आपटेने आपल्या अभिनयाचा झेंडा अगदी साता समुद्रापार फडकवला आहे. राधिकाचा जन्म तामिळनाडू मधील ‘वेल्लोर’ मध्ये झाला आहे. त्यानंतर तिचं कुटुंब पुण्यात स्थायिक झालं होतं. राधिकाचे वडील एक प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत. त्यांचं नाव चारुदत्त आपटे असं आहे.तिने आपलं  महविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये पूर्ण केल आहे. त्यांनतर तिने पुण्यातील ‘आसक्त’ या नाट्यसंस्थेत प्रवेश घेतला होता. इथूनचं तिच्या अभिनयाचा पाया भक्कम होत गेला.

(हे वाचा:Happy Birthday: वॉचमन ते अभिनेता, वाचा नवाजुद्दीन सिद्दिकीचा थक्क करणारा प्रवास)

राधिकाने कन्यादान, तू, पूर्णविराम यांसारख्या मराठी नाटकांमध्ये काम केल आहे. राधिकाने ‘लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. यामध्ये शाहिद कपूर आणि अमृता राव मुख्य भूमिकेत होते. यामध्ये राधिकाने एक छोटीशी भूमिका साकारली होती.

(हे वाचा:प्रियंका चोप्राचा पती निक जोनस जखमी, शोच्या शुटिंग दरम्यान झाली दुखापत)

त्यांनतर राधिकाने हिंदी, मराठी, बंगाली आणि हॉलिवूडमधीलही चित्रपटांत काम केल आहे. राधिकाने अंधाधून, मांझी, हंटर, कबाली अशा विविध चित्रपटांत काम केल आहे.

Published by: Aiman Desai
First published: May 18, 2021, 5:14 PM IST

ताज्या बातम्या