मुंबई, 27 जानेवारी : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. असाच बॉलिवूडमध्ये छाप पाडणारा मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आपल्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. आज श्रेयस तळपदे (Shreyas Talpade Birthday) त्याचा 45वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रेयसची प्रोफेशनल लाईफ जितकी धमाकेदार आहे, त्याहून मजेशीर त्याची लव्हस्टोरी आहे.
27 जानेवारी 1976 मध्ये मुंबईत श्रेयसचा जन्म झाला. मराठी टीव्ही शोमधून श्रेयसने आपल्या अभिनयातील करियरला सुरुवात केली. 2005 मध्ये श्रेयसने 'इक्बाल' (Iqbal) या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. या चित्रपटात केलेल्या अभिनयाने त्याचं सर्वत्र जबरदस्त कौतुक झालं. 'इक्बाल'नतंर त्याने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. अनेक चित्रपटांतून श्रेयसने साकारलेल्या महिला भूमिकांनाही, त्याचा लुक, कॉमेडी, अभिनयाला चाहत्यांची भरभरुन दाद मिळाली.
त्याच्या कामाप्रमाणे त्याची लव्हस्टोरीही फिल्मी आहे. 2000 रोजी श्रेयसला कॉलेजच्या एका फेस्टसाठी बोलवण्यात आलं होतं. कॉलेजच्या त्याच फेस्टिवलमध्ये दीप्ती सेक्रेटरी होती. श्रेयसला दीप्तीशी पहिल्या नजरेतच प्रेम झालं आणि केवळ चार दिवसांतच त्याने दीप्तीला प्रपोजही केलं. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर, त्यांचं 2004 मध्ये लग्न झालं. 14 वर्षांनंतर 4 मे 2018 मध्ये श्रेयस आणि दीप्ती सरोगसीद्वारे आई-बाबा बनले असून त्यांना एक मुलगी आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
श्रेयसने रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजव्यतिरिक्त, साजिद खानच्या हाउसफुल सीरिजमध्येही भूमिका साकारली आहे. नुकतंच त्याने OTT प्लॅटफॉर्मवर एन्ट्री केली असून OTT platform वर Nine Rasa वेंचर लाँच केलं आहे.