सेक्ससाठी नकार दिला म्हणून अनेक चित्रपटातून बाहेर काढले; अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्फोट!

सेक्ससाठी नकार दिला म्हणून अनेक चित्रपटातून बाहेर काढले; अभिनेत्रीचा मोठा गौप्यस्फोट!

चित्रपट निर्मात्याला हॉटनेस चेक करायचा होता आणि...

  • Share this:

नवी दिल्ली, 04 जुलै: बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री अशी ओळख असलेल्या मल्लिका शेरावतने एक धक्कादायक खुलासा केला आहे. मल्लिका सध्या तिच्या आगामी 'बू सबकी फटेकी' या वेब सीरीज प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच प्रमोशन दरम्यान तिने #METOO संदर्भात एक मोठ वक्तव्य केले आहे. या मोहिमेमुळे पीडित महिलांना त्यांच्यावरील अन्याय सांगण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीत अशा घटना दाबून ठेवणे अवघड झाले आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मल्लिकाने #METOO संदर्भात पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे. सह कलाकारासोबत सेक्स करण्यास नकार दिला म्हणून अनेक चित्रपटातून बाहेर काढण्यात आल्याचे मल्लिकाने म्हटले आहे. चित्रपटसृष्टीत होणाऱ्या अशा घटनांना रोखण्यासाठी या मोहिमेचा फायदा होईल असे ही मल्लिका म्हणाली. याआधी कपिल शर्मा शोमध्ये मल्लिकाने एक अजब किस्सा सांगितला होता. एका चित्रपट निर्मात्याला हॉटनेस चेक करायचा होता आणि त्यासाठी तिच्या पोटावर अंडा फ्राय करायची ईच्छा होती. पण मल्लिकाने त्यासाठी नकार दिला.

#METOOमुळे महिला सशक्त झाल्या आहेत. तर पुरुष घाबरले आहेत. ही मोहिम एक सकारात्मक पाऊल असल्याचे तिने म्हटले आहे. चित्रपटात काम करताना सुरक्षित वातावरण असने ही महिला आणि पुरुष हा दोघांचा अधिकार आहे. मल्लिकाच्या मते चित्रपटसृष्टीत महिला दिग्दर्शक, लेखक आणि सिनेमॅटोग्राफरची संख्या कमी आहे.

गेल्या काही वर्षापासून मल्लिका बॉलिवूडपासून दूर आहे. जीनत या अखेरच्या हिंदी चित्रपटात ती दिसली होती. आता मल्लिका 'बू सबकी फटेगी' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. हिंदी, इंग्रजी, तामिळ, चीनी चित्रपटानंतर आता मल्लिका वेब सीरीजमध्ये झळकणार आहे.

SPECIAL REPORT: माणुसकीला काळीमा! जमावाकडून तरुणीला काठीनं अमानुष मारहाण

First published: July 4, 2019, 12:29 PM IST

ताज्या बातम्या