Home /News /entertainment /

नोबल पुरस्कार विजेती मलालावरच्या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज

नोबल पुरस्कार विजेती मलालावरच्या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज

नोबल पुरस्कार विजेती मलाला युसुफझायी हिच्या आयुष्यावर बनलेल्या 'गुल मकाई' या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलंय. या पोस्टरमध्ये एका भागात हातात पुस्तक घेतलेली मलाला दिसतेय तर दुसऱ्या भागात पूर्णपणे उद्धस्त झालेला पाकिस्तान दिसतोय.

पुढे वाचा ...
मुंबई, 04 जुलै : नोबल पुरस्कार विजेती मलाला युसुफझायी हिच्या आयुष्यावर बनलेल्या 'गुल मकाई' या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलंय. या पोस्टरमध्ये एका भागात हातात पुस्तक घेतलेली मलाला दिसतेय तर दुसऱ्या भागात पूर्णपणे उद्धस्त झालेला पाकिस्तान दिसतोय. अमजद खान यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सिनेमाचा बहुतांश भाग काश्मीर खोऱ्यात शूट करण्यात आलाय. मलालाची भूमिका साकारतेय रीमा शेख. सिनेमाचं मोशन पोस्टर आकर्षक आहे. सिनेमात दिव्या, अतुल कुलकर्णी, पंकज त्रिपाठी, मुकेश ऋषी यांच्याही भूमिका आहेत. मलाला युसुफझायी ही पाकिस्तानातली सामाजिक कार्यकर्ती. तालिबाननं जिथे महिलांचं शिक्षण बंद केलं होतं, तिथे तिनं स्त्री शिक्षणासाठी मोठी चळवळ उभारली. 2012मध्ये तालिबान अतिरेक्यांनी तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. इंग्लंडमध्ये तिच्यावर उपचार झाले होते. तरीही स्त्री शिक्षणाचा लढा तिनं चालू ठेवला.
First published:

Tags: Biopic, Bollywood, Gul makai, Malala, Motion poster, गुल मकाई, पाकिस्तान, बाॅम्बस्फोट, बाॅलिवूड, मलाला

पुढील बातम्या