मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Malaika Arora अर्जुन कपूरशी लग्न करण्यासाठी तयार? अभिनेत्रीनेच दिला मोठा संकेत

Malaika Arora अर्जुन कपूरशी लग्न करण्यासाठी तयार? अभिनेत्रीनेच दिला मोठा संकेत

Malaika Arora and Arjun Kapoor Relationship: अलीकडेच मलायका अरोराने असं म्हटलं आहे की ती आणि अर्जुन कपूर त्यांच्या रिलेशनशिपच्या भविष्याचा विचार करत आहेत. तिने असं म्हटलं आहे की, अर्जुनच तिचा 'Man of Life' आहे आणि ते दोघं नेहमी त्यांच्या नात्याबाबत विचार करत असतात.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 05 मे: मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे (Malaika Arora and Arjun Kapoor) नेहमी चर्चेत राहणारं कपल आहे. जरी अनेक दिवसांपासून या कपलने त्यांच्या रिलेशनशिपबाबत कोणतेही भाष्य केले नसले तरी अनेकदा ते दोघं एकत्र स्पॉट झाले आहेत. सोशल मीडियावरही हे कपल एकमेकांसह फोटो शेअर करते. दरम्यान आता हे कपल त्यांचं नातं पुढील टप्प्यावर नेण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. याआधीही अनेकदा त्यांच्या लग्नाच्या अफवा समोर आल्या आहेत, मात्र अधिकृतरित्या दोघांकडूनही कोणतीच प्रतिक्रिया या मुद्द्यावर आलेली नाही.

मात्र आता मलायका अरोराने असं म्हटलं आहे की ती आणि अर्जुन कपूर त्यांच्या रिलेशनशिपच्या भविष्याचा विचार करत आहेत. तिने असं म्हटलं आहे की, अर्जुनच तिचा 'Man of Life' आहे आणि ते दोघं नेहमी त्यांच्या नात्याबाबत विचार करत असतात. दोघांमधील वयाच्या अंतरामुळे अनेकदा त्यांना ट्रोलिंगची शिकार व्हावं लागलं आहे मात्र तरीही ते दोघं कपल गोल्स देण्यात कुठेही मागे नाहीत. बाँबे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मलायकाने तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्याबाबत भाष्य केले आहे.

हे वाचा-प्रसिद्ध कॉमेडियनवर शो सुरू असतानाच हल्ला, Video होतोय Viral

मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या नात्याबद्दल म्हणाली, 'सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला माहित आहे की आम्हाला भविष्यातही एकमेकांची साथ हवी आहे. तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात पण तुम्ही 'अरे मला माहीत नाही' असे म्हणताय... मी माझ्या रिलेशनशिपच्या या टप्प्यावर नाही. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मला वाटते की आज आम्ही अशा स्थितीत आहोत जिथे आपण पुढे काय, पुढे कुठे याचा अधिक विचार करतो आहोत. या सगळ्याबद्दल आम्ही खूप बोलतो. आमचे विचार तेच आहेत, आमच्या कल्पना देखील सारख्या आहेत आणि आम्ही एकमेकांना खूप समजतो.

मलायका अरोरा पुढे म्हणाली, 'आम्ही परिपक्व टप्प्यावर आहोत जिथे अजून खूप गोष्टी करायच्या आहेत पण आम्ही आमचे भविष्य एकमेकांसोबत पाहतो. पुढे आम्ही ही गोष्ट कुठपर्यंत नेऊ ते बघता येईल. आम्ही त्यावर हसतो आणि विनोद करतो पण त्याबद्दल आम्ही खूप जास्त गंभीरही आहोत. आम्हाला आमच्या नातेसंबंधात सकारात्मक आणि सुरक्षित वाटते. अर्जुन मला आत्मविश्वास देतो.'

हे वाचा-चार लग्नांची परवानगी असल्याने 'या' लोकप्रिय गायकाला स्वीकारायचा आहे इस्लाम!

आता आम्ही सर्व पत्ते उघडू नयेत असेही मलायका म्हणाली. ती असं म्हणाली की, 'आम्ही आयुष्यात प्रेम करतो. मी अजूनही म्हणते की मला तुझ्याबरोबर पुढे जायचे आहे. आम्ही एकत्र निर्णय घेऊ पण मला माहित आहे की तो माझ्यासाठी खास आहे.'

First published:

Tags: Arjun kapoor, Malaika arora