मलायका अरोरा पुन्हा पोहोचली हॉस्पिटलमध्ये, नेमकं कारण तरी काय?

मलायका अरोराच्या हॉस्पिटल व्हिजिट्सची आता तुफान चर्चा होऊ लागली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 19, 2019 07:55 AM IST

मलायका अरोरा पुन्हा पोहोचली हॉस्पिटलमध्ये, नेमकं कारण तरी काय?

मुंबई, 19 एप्रिल : बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून कोणत्या-ना-कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. कधी बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबत असलेल्या अफेअरमुळे तर कधी व्हायरल होणाऱ्या स्वतःच्या हॉट फोटोंमुळे मलायकाची नेहमीच चर्चा असते. सध्या मलायका वारंवार हॉस्पिटलच्या वाऱ्या करताना दिसत आहे. तिच्या हॉस्पिटल व्हिजिट्सची आता तुफान चर्चा होऊ लागली आहे. नुकतेच अर्जुन कपूरसोबत एकत्र हॉस्पिटलबाहेर दिसलेली मलायका पुन्हा एकदा लीलावती हॉस्पिटलमध्ये गेले होती.

यापूर्वी तिचं हॉस्पिटलमध्ये दाखल होणे म्हणजे नियमित वैद्यकीय तपासणी असल्याचं चाहत्यानं मानलं होतं. पण मलायकाच्या वारंवार हॉस्पिटलच्या फेऱ्या पाहून आता तिचे चाहतेदेखील चिंतेत आहेत.त्यामुळे नेमकं मलायका येथे कोणाची भेट घेण्यासाठी आली होती? की तिच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या घडामोडींदरम्यान सोशल मीडियावर मलायका गरोदर असल्याचंही वृत्त पसरलं होतं. मलायकाप्रमाणेच ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोणपासून ते करीना कपूर गरोदर असल्याचीही चर्चा झाली होती.वाचा अन्य बातम्या

मुंबई : भरधाव ट्रक उलटून भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

बापरे ! BSPऐवजी BJPला केलं मतदान, पश्चाताप झाल्यानं त्यानं स्वतःचं बोटच कापलं

VIDEO : जेव्हा इशांत शर्मा रोहितला धमकावतो तेव्हा...

VIDEO : '3 नार्को टेस्ट झाल्या, 24 दिवस काही न खाता राहिले पण...' साध्वी प्रज्ञा झाल्या भावुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 07:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close