बाॅलिवूडचे 'हे' बापलेक एका सिनेमात येतायत एकत्र

बाॅलिवूडचे 'हे' बापलेक एका सिनेमात येतायत एकत्र

सडक सिनेमा तुफान चालला होता. त्याचा रिमेक बनवायची कल्पना संजय दत्तनंच पूजाला दिली होती.

  • Share this:

मुंबई, 3 सप्टेंबर : आलिया भट्ट सध्या चर्चेत आहे. अर्थात, चर्चेत असल्याचं कारण रणबीर कपूर आहेच. पण आलियाचं करियरही वेगवानपणे पुढे जातंय. तिनं राजी सिनेमात अप्रतिम काम केलं. तो सिनेमा हिटही झाला. आता आलिया बाॅलिवूडच्या एका मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करतेय. आणि ते तिचे वडील आहेत.

हो, आलिया 'सडक 2'मध्ये दिसणार आहे. त्यात ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सडक सिनेमा तुफान चालला होता. त्याचा रिमेक बनवायची कल्पना संजय दत्तनंच पूजाला दिली होती. आता सडक 2मध्ये संजय दत्त आणि पूजा भट्टही दिसणार आहेत.

संजय दत्त या सिनेमाबद्दल एकदम इमोशल आहे. कारण या सिनेमानं त्याला त्याचा स्टारडम परत मिळवून दिला होता. सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होणारेय.

आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची सध्या बॉलिवूडमध्ये जबरदस्त चर्चा आहे. मात्र हे दोघेही आता त्यांच्या नात्याबद्दल काहीही उघडपणे सांगायला तयार होत नाहीत. कधी रणबीर कपूर म्हणतोय, असं काहीच नाही. तर कधी आलिया रणबीरबद्दल विचारलं तर नुसती स्माईल देते. कधी एकमेकांचे वडील त्यांचं कौतुक करतात. आता सांगा, फॅन्सनी नक्की समजायचं तरी काय?

आता पहिल्यांदाच एका मॅगेझीनसाठी दोघांनी फोटोशूट केलंय. हे दोघेही अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्र सिनेमात एकत्र काम करत असले तरीही एकत्र फोटोशूट करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे त्यांचा हा लूक पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स आतुर असणार हे काही वेगळं सांगायला नको.

Loading...

आपल्या आणि आलियाविषयी बोलताना रणबीरने हा खुलासाही केला की, आम्ही दोघेही प्राणीप्रेमी आहेत. बऱ्याचदा या दोघांना आपापल्या पाळीव प्राण्यांसोबत फोटो शेयर करताना पाहिलं गेलं आहे.

व्हिडिओ : अशी फोडली गोपिकांनी हंडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2018 03:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...