S M L

माधुरी दीक्षित सरोज खानसोबतच्या जुगलबंदीला सज्ज

माधुरीच्या गुरू सरोज खान. त्यांच्याकडूनच माधुरीनं नृत्याचे धडे गिरवले होते. आता पुन्हा एकदा माधुरी आणि सरोज खान आमनेसामने येणार आहेत.

Updated On: Aug 25, 2018 05:39 PM IST

माधुरी दीक्षित सरोज खानसोबतच्या जुगलबंदीला सज्ज

मुंबई, 25 आॅगस्ट : अभिनेत्री माधुरी दीक्षितचा मुजरा आपण सगळ्यांनी 'देवदास' सिनेमात पाहिलाय. माधुरीच्या नृत्याच्या अदांनी सगळेच घायाळ होतात. माधुरीच्या गुरू सरोज खान. त्यांच्याकडूनच माधुरीनं नृत्याचे धडे गिरवले होते. आता पुन्हा एकदा माधुरी आणि सरोज खान आमनेसामने येणार आहेत. बातमी अशी आहे की, कलंक सिनेमात माधुरी दीक्षितचा मुजरा आहे. आणि या मुजरा नृत्यासाठी सरोज खान आणि रेमो दोघं एकत्र येऊन कोरिओग्राफी करणार आहेत.

'तेजाब' सिनेमातील 'एक.. दो.. तीन' , 'बेटा' चित्रपटातील 'धक-धक' व 'खलनायक' सिनेमातील 'चोली के पिछे क्‍या है' यांसारख्या अनेक गाण्यांवरील डान्स माधुरीला सरोज खान यांनी शिकवला आहे. ही जोडी आता चार वर्षांनी पुन्हा एकत्र येणार आहे. सरोज खाननं माधुरीवर केलेली सगळी नृत्य आतापर्यंत हिट झालीयत. त्यामुळे कलंकमधल्या मुजऱ्याकडून अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

5,6,7 सप्टेंबरला या गाण्याचं शूटिंग होणार आहे.माधुरी दीक्षित आणि संजय दत्तचा सिनेमा कलंकबद्दल खूप उत्सुकता आहे. अर्थात, माधुरी कुठल्या भूमिकेत असेल याबद्दलही तर्कवितर्क लढवले जात होतेच. पण आता माधुरीच्या भूमिकेबद्दल कळलंय. कलंकमध्ये माधुरी वेश्येच्या भूमिकेत आहे. शिवाय ती कथ्थक नृत्यांगनाही आहे.

देवदासमध्ये माधुरी दीक्षितनं वेश्या साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा ती अशाच भूमिकेत दिसणार आहे. कलंक हा पीरियड ड्रामा आहे. त्यात संजय दत्त राजाच्या भूमिकेत असेल.

माधुरी आणि संजय दत्त २५ वर्षांनी सिनेमात एकत्र काम करतायत. याशिवाय सिनेमात वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर यांच्याही भूमिका आहेत.

VIDEO : भिवंडीत रेडा झाला वेडा, वाहनांची केली तोडफोड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 25, 2018 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close