रितेश-जेनेलिया मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र दिसणार? अभिनेत्रीच्या कमबॅकसाठी चाहते उत्सुक

रितेश-जेनेलिया मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र दिसणार? अभिनेत्रीच्या कमबॅकसाठी चाहते उत्सुक

रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia D'souza Deshmukh) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

  • Share this:

मुंबई,18 डिसेंबर: 'डेब्यू पार्टनर टू लाईफ पार्टनर' असा यशस्वी प्रवास करणारे रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनेलिया डिसूझा देशमुख (Genelia D'Souza Deshmukh) या बॉलिवूड कपलचे लाखो चाहते आहेत. आठ वर्षापूर्वी हे बीटाउन कपल 'तेरे नाल लव्ह हो गया' (Tere Naal Love Ho Gaya) या सिनेमात एकत्र दिसले होते आणि त्याच वर्षी दोघंही लग्न बंधनात अडकले. त्यानंतर रितेशने हाऊसफुल फ्रँचायझी (Housefull), एक व्हिलन (Ek Villain), टोटल धमाल (Total Dhamal), बाघी 3 (Baaghi 3) सारख्या बहुचर्चित बॉलिवूड  सिनेमात काम केलं. मराठी सिनेमात देखील रितेशने या काळात पदार्पण केलं.  पण लग्नानंतर जेनेलिया मात्र गेस्ट अपिअरन्स व्यतिरिक्त कुठल्याही मोठ्या भूमिकेत दिसून आली नाही.

पण आता जेनेलिया लवकरच कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एवढंच नाही तर जेनेलिया आणि रितेश लवकरच मोठया पडद्यावर एकत्र झळकणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत या बॉलिवूड जोडप्याने एकत्र चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले की, जर एखाद्या चित्रपट निर्मात्याने चांगली स्क्रिप्ट दिल्यास दोघंही एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.  यावर जेनेलिया म्हणाली की माझा पदार्पणाचा सिनेमा रितेशबरोबर होता आणि लग्नापूर्वी शेवटचा चित्रपटही रितेशबरोबर होता, मग आता कमबॅक करताना मला पुन्हा एकदा रितेश बरोबर एकत्र काम करायला आवडेल.

(हे वाचा-Bollywood Drugs प्रकरणाला वेगळं वळण; करण जोहर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता)

मुलाखती दरम्यान दोघांनीही त्यांच्या 'हॅप्पी मॅरीड लाईफ'मधल्या बऱ्याच गमती जमती शेअर केल्या. रितेश म्हणाला की जेनेलिया फारच 'क्युरियस वाइफ' आहे, ती त्याला प्रश्न विचारून एवढी भंडावून सोडते कि आता रितेशने तिला दिवसाला फक्त 10 प्रश्न विचारायची मुभा दिली आहे. जेनेलिया तिचा हा 10 प्रश्नांचा  कोटा अगदी सकाळी 5 मिनिटातच पूर्ण करते. यावर जेनेलिया म्हणाली  'हॅप्पी वाइफ, हॅपी लाइफ' या मंत्राचं मात्र रितेश कायम पालन करतो.

रितेश आणि जेनेलिया 2 गोंडस मुलांचे आई -वडील आहेत. पण रितेश सांगतो, त्यांच्या  मुलांना अजूनही  माहित नाही की त्यांचे आई वडील सेलिब्रिटीज आहेत. त्यांनी आमचा कोणताही चित्रपट बघितला नाही. काही दिवसांपूर्वी  रितेशच्या मुलांनी पहिल्यांदाच  रितेशचा टोटल धमाल सिनेमा बघितला. पण सिनेमा बघितल्यानंतर  त्यांचा असा समज आहे कि सगळेच वडील पार्ट टाइम जॉब म्हणून सिनेमात अभिनय करतात.

रितेश आणि जेनेलियाने तुझे मेरी कसम या सिनेमातून 2003 साली डेब्यू केला होता. तेव्हापासूनच हे कपल बॉलिवूड च्या मोस्ट फेमस कपलपैकी एक आहे.

Published by: News18 Desk
First published: December 18, 2020, 6:47 PM IST

ताज्या बातम्या