मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बिग बींना 'दिवार'चं टेन्शन, घरावर होणार कारवाई?, लोकायुक्तांनी BMC ला दिले आदेश

बिग बींना 'दिवार'चं टेन्शन, घरावर होणार कारवाई?, लोकायुक्तांनी BMC ला दिले आदेश

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan

लिवूड (Bollywood) अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bchchan) अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नुकताच लोकायुक्तांनी बीएमसीला (BMC) अमिताभ बच्चनसंबंधी एक आदेश दिला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध जुहू येथील प्रतिक्षा बंगल्यातील रस्ता रुंदीकरणासाठी या वर्षी जुलैमध्ये सिटी सर्व्हे अधिकार्‍यांना भागाचे सीमांकन करण्यास सांगण्यात आले होते. परंतु अजूनही बीएमसीने रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेतलेली नाहीय. त्यामुळे काँग्रेसने महाराष्ट्र लोकायुक्तांकडे नागरीकांकडून तक्रार केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 30  नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता अमिताभ बच्चन  (Amitabh Bchchan)  अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण नुकताच लोकायुक्तांनी बीएमसीला   (BMC)  अमिताभ बच्चनसंबंधी एक आदेश दिला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध जुहू येथील प्रतिक्षा बंगल्यातील रस्ता रुंदीकरणासाठी या वर्षी जुलैमध्ये सिटी सर्व्हे अधिकार्‍यांना भागाचे सीमांकन करण्यास सांगण्यात आले होते. परंतु अजूनही बीएमसीने रस्ता रुंदीकरणासाठी जागा ताब्यात घेतलेली नाहीय. त्यामुळे काँग्रेसने महाराष्ट्र लोकायुक्तांकडे नागरीकांकडून तक्रार केली आहे.

काँग्रेसने बीएमसीच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.जुलै महिन्यात रस्ता रुंदीकरणासाठी बीएमसीने शहर जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व्हे अधिकाऱ्यांना रस्ता रुंदीकरणासाठी त्या भागाचे सीमांकन करण्यास सांगण्यात आले होते. मात्र या प्रकरणात आजही कोणतेच ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे काँग्रेसने लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. या सर्व संबंधी अमिताभ बच्चन यांना २०१७ मध्ये नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून कोणतंच उत्तर मिळालं नव्हतं.

या प्रकरणात लोकायुक्त न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांनी बीएमसीला अमिताभ यांच्या जुहू येथील बंगल्याचा तो भाग ताब्यात घेण्यासाठी केलेल्या पावलांचा अहवाल चार आठवड्यांत नागरी संस्थेला सादर करण्यास सांगितले आहे. वास्तविक संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी बंगल्याचा काही भाग पाडावा लागणार होता. काही महिन्यांपूर्वीच म्हणजे २ जुलै दरम्यान अशी बातमी आली होती. की, नोटीस पाठवण्याच्या तब्बल चार वर्षांनंतर बीएमसीने अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध प्रतीक्षा बंगल्याची भिंत पडण्याचा निर्णय घेतला आहे.

(हे वाचा:VIDEO: सारा अली खानच्या बॉडीगार्डनं केलं असं काही... अभिनेत्रीने मागितली माफी)

२०१७ मध्ये अमिताभ बच्चन यांना कायदेशीर नोटीस पाठवून, त्यांच्या बंगल्याचा काही भाग रस्ता रुंदीकरणासाठी देण्यास सांगण्यात आले होते. प्रतीक्षा बंगल्यापासून इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बीएमसीने हा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. योजनेअंतर्गत संत ज्ञानेश्वर रस्त्याचे ४० ते ६० फूट रुंदीकरण करायचे आहे.अशातच बीएमसीने २०१९ मध्ये सटे बाऊंड्रीवरील भिंत पडली होती. मात्र अमिताभ यांची भिंत अशीच सोडून दिली होती. दरम्यान काँग्रेसचे नगरसेवक ट्यूलिप मिरांडा यांनी बीएमसीच्या पश्चिम प्रभागात हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या भागाच्या रुंदीकरणात मुद्दामहून विलंब करत असल्याचा आरोप केला आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, BMC