मुंबई, 17 नोव्हेंबर : बॉलिवूड अॅक्शन हिरो अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) स्टारर 'लक्ष्मी' (Laxmii) चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टार VIP वर (Disney Plus Hotstar VIP) प्रदर्शित झाला. कोरोना काळात लॉकडाउननंतर आलेल्या 'लक्ष्मी' चित्रपटाला भारतात तितकाचा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र या चित्रपटाला परदेशात मोठी पसंती मिळते आहे. परदेशी बॉक्स ऑफिसवर 'लक्ष्मी' कोरोना व्हायरस आणि निगेटिव्ह रिव्ह्यूजनंतरही जबरदस्त कमाई करतो आहे.
(वाचा - PHOTO: कोरोना काळात पाणीपुरी चाहत्यांसाठी जबरदस्त मशीन; पाहा नेमकं कसं काम करतं)
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वीकेंडला लक्ष्मी चित्रपटाचं वर्ल्डवाईड कलेक्शन शेअर केलं आहे. या कलेक्शनवरून चित्रपटाला परदेशात जबरदस्त पसंती मिळत असल्याचं कळतंय. तरण आदर्श यांनी लक्ष्मी चित्रपटाबाबत एक ट्विट केलं आहे. त्यानुसार या चित्रपटाने एका आठवड्यात युएईमध्ये 1.46 कोटींचं कलेक्शन केलं आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये 70.48 लाख, फिजीमध्ये 17.16 लाख आणि न्यूजीलँडमध्ये 42.38 लाखांची कमाई केली आहे.
#Laxmii - #UAE... Mon [9 Nov 2020] $ 44,199 Tue [10 Nov 2020] $ 25,069 Wed [11 Nov 2020] $ 20,207 Thu [12 Nov 2020] $ 35,407 Fri [13 Nov 2020] $ 41,690 Sat [14 Nov 2020] $ 17,536 Sun [15 Nov 2020] $ 11,597 Total: $ 195,705 [₹ 1.46 cr]
— taran adarsh (@taran_adarsh) November 16, 2020
मार्च 2020 पासून आतापर्यंत परदेशात प्रदर्शित झालेला हा पहिलाच चित्रपट आहे. कोरोना व्हायरस (coronavirus) काळात चित्रपटगृहांच्या उपलब्धेच्या हिशोबाने चित्रपटाची कमाई चांगली असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. 'लक्ष्मी' साउथ इंडियन चित्रपट 'कंचना'चा रिमेक आहे. राघव लॉरेन्स यांच्या या चित्रपटात अक्षय कुमार, कियारा आडवाणी, शरद केळकर, अश्विनी कलसेकरमनु, रजा चड्ढा, राजेश शर्मा यांनी भूमिका साकारल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood, Coronavirus