'धर्म परिवर्तनासाठी दबाव'; दिवंगत संगीतकार वाजिद खान यांच्या पत्नीचे सासरच्यांवर गंभीर आरोप

'धर्म परिवर्तनासाठी दबाव'; दिवंगत संगीतकार वाजिद खान यांच्या पत्नीचे सासरच्यांवर गंभीर आरोप

वाजिद खान यांच्या कुटुंबियांकडून धर्म परिवर्तनाचा दबाव आणला जात असल्याचा आरोप कमालरुखने केला आहे. कमालरुखने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर : कोरोना काळात कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांचं निधन झालं. यापैकी एक वाजिद खान यांनी दीर्घकालीन आजारामुळे 1 जून 2020 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत, कलाविश्वासह चाहत्यांनाही मोठी धक्का बसला. वाजिद खान यांच्या जाण्याने संगीत विश्वातील साजिद-वाजिद ही सुप्रसिद्ध जोडी कायमची तुटली. याचदरम्यान दिवंगत संगीतकार वाजिद खान यांची पत्नी कमालरुख खानने आपल्या सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

वाजिद खान यांच्या कुटुंबियांकडून धर्म परिवर्तनाचा दबाव आणला जात असल्याचा आरोप कमालरुखने केला आहे. कमालरुखने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने आपलं म्हणणं सर्वांसमोर मांडलं आहे. कमालरुखने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, वाजिद खान यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून धर्म परिवर्तनासाठी दबाव आणला जात आहे. कमालरुख आणि वाजिद खान यांनी इंटर कास्ट मॅरेज अर्थात आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे आता धर्म परिवर्तनासाठी दवाब आणला जात असल्याचा आरोप वाजिद खान यांच्या पत्नीने केला आहे.

कमालरुखने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. 'मी पारसी होते आणि वाजिद मुस्लीम. आम्ही दोघांनी स्पेशल मॅरेज ऍक्टअतंर्गत लग्न केलं. मी याबाबत माझा अनुभव शेअर करते की, कशाप्रकारे इंटरकास्ट मॅरेजनंतर आता माझ्यासोबत धर्माच्या आधारे भेदभाव केला जात आहे. हे अतिशय लज्जास्पद असून सर्वांचेच डोळे उघडवणारं आहे' अशा आशयाची पोस्ट तिने केली आहे.

वाजिद खान यांच्या कुटुंबियांकडून कमालरुखच्या आरोपांवर अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. वाजिद खान यांच्या अस्वास्थ्यामुळे मे 2020 मध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र 1 जून रोजी त्यांचं निधन झालं.

Published by: Karishma Bhurke
First published: November 29, 2020, 11:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading