Home /News /entertainment /

सुशांत सिंह राजपूत आणि त्याच्या बेस्ट फ्रेंडचा जुना फोटो होतोय VIRAL, वाचा काय आहे कारण

सुशांत सिंह राजपूत आणि त्याच्या बेस्ट फ्रेंडचा जुना फोटो होतोय VIRAL, वाचा काय आहे कारण

24 तारखेला ‘ब्रदर्स डे’ (Brother's Day) साजरा करण्यात आला. यावेळी अभिनेता सुशांत सिंहच्या बहिणीला (Sushnat singh's Sister) त्याची प्रचंड आठवण येत होती. शिवाय त्याचा मित्र महेश शेट्टी देखील सुशांतच्या आठवणीत रमला होता.

  मुंबई, 26 मे: अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू (Sushant Singh Rajput Death) ही घटना आजही बॉलिवूडमधील एक धक्कादायक घटना आहे. त्याच्या आठवणी अनेकजण सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान 24 तारखेला ‘ब्रदर्स डे’ (Brother's Day)  साजरा करण्यात आला. यावेळी अभिनेता सुशांत सिंहच्या बहिणीला (Sushant Singh's Sister) त्याची प्रचंड आठवण येत होती. त्याचंबरोबर ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta) फेम आणि सुशांतचा जवळचा मित्र असणाऱ्या महेश शेट्टीला (Mahesh Shetty) सुद्धा आपल्या मित्राची खूप आठवण येत होती. त्यामुळे महेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुशांतबरोरचे जुने फोटो शेअर केले होते. हे फोटो बघता बघता मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले आहेत. महेश शेट्टी सुशांतचा खास मित्र होता. त्यांनी ‘पवित्र रिश्ता’ मध्ये एकत्र काम केल होतं. या दोघांची मैत्री इतकी घट्ट झाली होती, की ते एकमेकांना भाऊ समजत होते. इतकचं नव्हे तर सुशांतने शेवटचा संवाद देखील महेश सोबतचं साधला होता. त्यांचं हे नातं खुपचं खास होतं. त्यामुळे महेश अनेकदा सुशांतच्या आठवणीत रमलेला असतो. त्यामुळेच ब्रदर्स डेचं निमित्त साधत महेशने सुशांतसोबतचा आपला जुना फोटो इन्स्टा स्टोरीला शेयर केला होता. फोटोमध्ये हे दोघे सोबत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता.
  तसेच काही दिवसांपूर्वी महेश शेट्टीच्या वाढदिवसाला सुशांतच्या बहिणीने सुशांतने विश केलेला एक थ्रोबेक फोटो शेअर करत महेशला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर महेशने कमेंट करत आभार मानले होते. आणि हे त्याच्यासाठी खूप खास आणि महत्वाचं असल्याचं देखील म्हटलं होतं. 21 मे 2020 मध्ये सुशांतने आपल्या इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट करत महेशला शुभेच्छा देत लिहिलं होतं, ‘हॅप्पी बर्थडे मेरी जान’. (हे वाचा: चाहत्याचा सोनाली कुलकर्णीच्या पिंपरी चिंचवडमधील घरात राडा, वडील जखमी) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ मध्ये हे कलाकार एकत्र आले होते. या मालिकेदरम्यान त्यांच्यात एक विशिष्ट नात निर्माण झालं होतं. सुशांतच्या मृत्यूनंतरही हे नातं असचं टिकून आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या