• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Shahrukh Khan चं नाव 'इंडियन साईन लँग्वेज डिक्शनरी'त सामील; PM Modi नी केलं होतं लाँच

Shahrukh Khan चं नाव 'इंडियन साईन लँग्वेज डिक्शनरी'त सामील; PM Modi नी केलं होतं लाँच

या महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साईन लँग्वेज डेचं निमित्त साधत 'साईन लँग्वेज डिक्शनरी'चं प्रकाशन केलं होतं. यामध्ये आत्ता अभिनेता शाहरुख खानच्या नावाचादेखील समावेश करण्यात आला आहे.

 • Share this:
  मुंबई, 24सप्टेंबर- बॉलिवूड(Bollywood) किंग अर्थातच शाहरुख खान(Shahrukh Khan) बऱ्याच दिवसांपासून पडद्यापासून दूर आहे. असं असलं तरी तो सर्वांच्या चर्चेत नेहमीच आहे. एखादी जाहिरात असो किंवा नवा लूक. शाहरुख खान सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. अशातच शाहरुख एक नव्या गोष्टीसाठी चर्चेत आला आहे. आणि ती गोष्ट म्हणजे 'इंडियन साईन लँग्वेज डिक्शनरी '(Indian Sign Language Dictonary)  होय. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या डिक्शनरीचं प्रकाशन केलं होतं. आत्ता यामध्ये अभिनेता शाहरुख खानच्या नावाचाही समावेश झाला आहे. या महिन्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साईन लँग्वेज डेचं निमित्त साधत 'साईन लँग्वेज डिक्शनरी'चं प्रकाशन केलं होतं. यामध्ये आत्ता अभिनेता शाहरुख खानच्या नावाचादेखील समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शाहरुख खानचे चाहते फारच आनंदी झाले आहेत. दिव्यांग मुलांच्या मदतीसाठी या डिक्शनरीच प्रकाशन करण्यात आलं होतं. यामध्ये आत्ता शाहरुख खानचं नाव जोडलं गेलं आहे. जर कोणाला शाहरुख खान म्हणायचं असेल तर तो व्यक्ती आपल्या दोन बोटांना बंदुकीसारखं धरून २ वेळा हृदयाजवळ टॅप करेल त्यावरून शाहरुख खान हे नाव समजेल. या डिक्शनरीमध्ये तब्बल १० हजार शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये एक शाहरुख खानसुद्धा आहे. (हे वाचा:Bigg Boss 15: सलमान खानच्या शोमध्ये या 5 नावांची एन्ट्री झाली कन्फर्म; पाहा LIST) वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेता शाहरुख खान शेवटचं 'झिरो' या चित्रपटात दिसला होता. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा, कतरिना कैफ आणि मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगांवकरदेखील होती. मात्र या चित्रपटाला हवं तसं यश मिळालं नव्हतं. त्यांनतर आगामी काळात शाहरुख 'पठाण' चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणसुद्धा मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचं शूटिंगदेखील सुरू आहे. तसेच शाहरुख खानच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्रीच्यादेखील चर्चा सुरु आहेत. मात्र अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीय. सलमान खानने एका पोस्टने सर्वांना संमभ्रमात पाडलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: