मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /शाहरुख खानच्या आयुष्यातला सर्वात मोठा चित्रपट 2021 मध्ये होणार प्रदर्शित, VIDEO मध्ये दिली हिंट

शाहरुख खानच्या आयुष्यातला सर्वात मोठा चित्रपट 2021 मध्ये होणार प्रदर्शित, VIDEO मध्ये दिली हिंट

शाहरुखने (Shahrukh khan) 2021 मध्ये आपण सर्वजण आपण पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीनवर भेटणार आहोत, असं म्हटल्याचा व्हिडिओ समोर येताच ट्विटरवर (Twitter) त्यांचा आगामी चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई, 02 जानेवारी: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खानने (Shahrukh Khan new movie) आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा प्रतीक्षा करायला लावली. पण आज किंग खानने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय नवीन वर्षाच्या शुभेच्छा (New year 2021) देण्यासाठी उशीर झाल्याबद्दल त्यांनी चाहत्यांची माफीही मागितली आहे. पण माफी मागण्यापूर्वी माशांनी आणि डासांनी शाहरुखला खूपच त्रास दिल्याचं दिसलं. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

शाहरुख खानने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या सुरूवातीला माशा आणि डासांचा आवाज ऐकू येताच स्वत: किंग खानही अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळालं. शाहरुखने नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला उशीर  केल्याबद्दल त्याने चाहत्यांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. शाहरुखनं या व्हिडिओमध्ये सांगितलं की, त्यांची टीम एकत्र नव्हती, त्यामुळे त्यांना स्वत: ला हा व्हिडिओ बनवावा लागला.

शाहरुखने व्हिडिओमध्ये म्हटलं की, '2020 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी खूपचं वाईट गेलं आहे. पण मला विश्वास आहे की जेव्हा कोणी आपल्या आयुष्यात सर्वात खाली पोहचतो. तेव्हा एकच पर्याय उरतो. तो म्हणजे पुन्हा नव्याने उत्तुंग भरारी घेण्याचा.  2020 हे वर्ष जसं का असेना पण तो आता आपला भूतकाळ आहे. त्यामुळं मला विश्वास आहे की, 2021 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी खूप सुंदर वर्ष असेल.'

या व्हिडिओच्या शेवटी शाहरुख खानने म्हटलं की, 2021 मध्ये आपण सर्वजण आपण पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीनवर भेटणार आहोत. शाहरुखचा हा व्हिडिओ त्याच्या समोर येताच ट्विटरवर त्यांचा आगामी चित्रपट #Pathan ट्रेंड झाला. नुकतचं शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांनी त्यांच्या 'पठाण' या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचं शूटिंग पूर्ण केलं आहे. दोघंही या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यग्र होते. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकासोबत जॉन अब्राहमही दिसणार आहे.

First published:
top videos

    Tags: Shahrukh khan