मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शाहरुखच्या लेकीची बॉलिवूडमध्ये होणार धमाकेदार एन्ट्री;या चित्रपटात झळकणार सुहाना

शाहरुखच्या लेकीची बॉलिवूडमध्ये होणार धमाकेदार एन्ट्री;या चित्रपटात झळकणार सुहाना

शाहरुख खान जितका फेमस आहे. तितकीच तिची लेक सुहाना खानसुद्धा (Suhana Khan) फेमस झाली आहे

शाहरुख खान जितका फेमस आहे. तितकीच तिची लेक सुहाना खानसुद्धा (Suhana Khan) फेमस झाली आहे

शाहरुख खान जितका फेमस आहे. तितकीच तिची लेक सुहाना खानसुद्धा (Suhana Khan) फेमस झाली आहे

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 18 ऑगस्ट- बॉलिवूड (Bollywood) किंग शाहरुख खान (Shahrukh Khan) जितका फेमस आहे. तितकीच तिची लेक सुहाना खानसुद्धा (Suhana Khan) फेमस झाली आहे, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. शाहरुखच्या मुलीने अजूनही चित्रपटात एन्ट्री (Bollywood Entry) केलेली नाही. तरीसुद्धा एखाद्या अभिनेत्री इतका तिचा चाहतावर्ग आहे. मीडिया रिपोर्टनुसार लवकरच सुहानाच्या बॉलिवूड एन्ट्रीची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.
View this post on Instagram

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार सुहाना लवकरच आपला बॉलिवूड डेब्यू करणार असल्याचं सांगितलं जात आहे. जास्तीत जास्त स्टार किड्सच्या मुलांना दिग्दर्शक करण जोहरनं लॉन्च केलं आहे. त्यामुळे सर्वांनाचं अपेक्षा होती, की सुहानालासुद्धा करण जोहरचं लॉन्च करणार. मात्र पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार जोया अख्तर सुहाना खानला लॉन्च करणार असल्याचं म्हटलं जात आहे. जोयाने आपल्या आगामी चित्रपटासाठी सुहानाची निवड केल्याचं म्हटलं जात आहे. (हे वाचा:सिद्धार्थने शेयर केलं कॅप्टन विक्रम बत्रांनी लिहिलेलं पत्र; वाचून तुम्हीही व्हाल  ) रिपोर्टनुसार, जोया अख्तर सध्या आंतरराष्ट्रीय कॉमिक बुक असणाऱ्या ‘आर्ची फॉर ए स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म’वर काम करत आहे. यातील मुख्य भुमिकेसाठी जोयाने सुहानाला निवडल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच या चित्रपटासाठी आणखी एका फ्रेश फेसचा शोध सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. कारण हा चित्रपट एका टीनएज जनरेशनवर आधारित असणार आहे. (हे वाचा:लग्नानंतर अभिनेत्री यामी गौतमनं बदललं आपलं नाव; हे आहे नवं नाव  ) सुहाना खानबद्दल सांगायचं झालं, तर ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांचं लक्ष लागलेलं असतं. तसेच तिच्या प्रत्येक फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये आपलं शिक्षण घेत आहे. ती सतत आपल्या मित्रांसोबत फोटो शेयर करताना दिसून येते. शाहरुखनंतर आता सुहानाला चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
First published:

Tags: Shahrukh khan

पुढील बातम्या