स्वरा भास्करने दारू पिऊन थेट शाहरुख खानलाच दिला होता त्रास, अशी होती किंग खानची Reaction

स्वरा भास्करने दारू पिऊन थेट शाहरुख खानलाच दिला होता त्रास, अशी होती किंग खानची Reaction

स्वरा भास्करने (Swara Bhaskar) ने स्वत: हा किंग खान शाहरुख (Shahrukh Khan) बाबतचा किस्सा शेअर केला आहे. तिच्या अशा वागण्यावर शाहरुखचे वर्तन कसे होते, हे देखील तिने सांगितले आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या अभिनयाबरोबरच वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. यावेळी स्वरा भास्करने कोणते वक्तव्य केले नाही आहे पण तिने शाहरुख खान (Shahrukh Khan) बरोबर घडलेला एक किस्सा शेअर केला आहे. स्वरा शाहरुखबाबत बोलताना असे म्हणाली की, बॉलिवूडच्या एका पार्टीमध्ये तिने खूप ड्रिंक केली होती आणि त्यानंतर तिने शाहरुखला खूप त्रास दिला होता, त्याची गंमत केली होती. स्वराने याबाबत देखील सांगितले की तिच्या या वर्तनानंतर शाहरुखने काय केले होते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्वराला आनंद एल राय यांच्या वाढविसाच्या पार्टीतील एक फोटो दाखवला होता, ज्यामध्ये ती शाहरुखबरोबर दिसत होती. स्वराने हा फोटो पाहून म्हटले की, 'या पार्टीत मी क्रॉप टॉप घालून गेले होते कारण त्यावेळी मी खूप बारीक आणि योग्य शेपमध्ये होते. त्या पार्टीत मी खूप दारू प्यायले होते आणि शाहरुखला त्रास दिला होता. शाहरुख माझा त्रास सहन होते. मी त्यांना एवढा त्रास दिला तरी देखील काहीच बोलले नाहीत.'

वीरे दी वेडिंगचा येणार सिक्वेल

‘वीरे दी वेडिंग (Veere Di Wedding)’ या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. यामध्ये करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), स्वरा भास्कर, शिखा तलसानिया आणि सोनम कपूर (Sonam Kapoor) यांची मुख्य भूमिका होती. चार मैत्रिणींची कहाणी या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

(हे वाचा-Mirzapur 2: खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे 'त्रिपाठी' कुटुंबाची मोलकरीण)

स्पॉटबॉयमधील एका अहवालात असे म्हटले आहे की, पहिल्या पार्टमधील स्टार कास्टसमवेतच दुसरा पार्ट देखील बनवण्यात येणार आहे. त्यामुळे निर्मात्यांना काही काळ वाट बघावी लागणार आहे, कारण करीना कपूर खान प्रेग्नेंट आहे.

(हे वाचा-Mirzapur 2: कालीन भैया ते गुड्डू पंडित सगळे आहेत करोडपती! वाचा किती आहे संपत्ती)

योगायोगाची गोष्ट अशी की, 'वीरे दी वेडिंग'च्या पहिल्या भागाचे शूटिंग दरम्यान देखील करीना प्रेग्नेंट होती, तिने तैमुरला जन्म दिल्यानंतर या सिनेमाचे शूटिंग सुरू करण्यात आले होते. 'वीरे दी वेडिंग' चा पहिला भाग स्वरा भास्करच्या बोल्ड अंदाजामुळे देखील वादग्रस्त ठरला होता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 31, 2020, 11:48 AM IST

ताज्या बातम्या