करिनाला करायचंय पुन्हा लग्न कारण...

करिनाला करायचंय पुन्हा लग्न कारण...

सैफची बायको, तैमुरची आई पुन्हा लग्न करू इच्छितेय. तिनं हे सांगितलंय मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला.

  • Share this:

15 एप्रिल : करिना कपूरला पुन्हा एकदा लग्न करायचंय. असं तिनं अगदी खुलेआम सांगितलंय. होय, सैफची बायको, तैमुरची आई पुन्हा लग्न करू इच्छितेय. तिनं हे सांगितलंय मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला.

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर आणि करिना कपूर नुकत्याच एका ज्वेलरी ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी एकत्र आल्या होत्या. या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये करिना मानुषीला तुला कशा प्रकारे लग्न करायचं आहे? असा प्रश्न विचारतेय. मानुषी तिला आपल्या लग्नाचे प्लान्स सांगते.  ते ऐकून करिनाला देखील पुन्हा लग्न करण्याचा मोह होतो,  असं या जाहिरातीत दाखवण्यात आलंय.

मानुषीची ही पहिलीच जाहिरात अाहे. दोघीही या ट्रॅडिशनल लूकमध्ये कमालीच्या सुंदर दिसतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2018 12:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading