मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

"...मग इंडस्ट्री सोड", कंगनाच्या आरोपांनंतर त्रस्त झालेल्या करण जोहरचा VIDEO VIRAL

"...मग इंडस्ट्री सोड", कंगनाच्या आरोपांनंतर त्रस्त झालेल्या करण जोहरचा VIDEO VIRAL

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) दिग्दर्शक करण जोहरवर (Karan Johar) सातत्याने आरोप करत आली आहे, याच आरोपांवर करण जोहरने प्रतिक्रिया दिली होती.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 20 जुलै : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सातत्याने फिल्म इंडस्ट्रीतील नेपोटिझम आणि आऊटसायडर्सना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबाबत स्पष्टपणे बोलत आली आहे. तिने दिग्दर्शक करण जोहरच्या समोरच त्यावर नेपोटिझमचा आरोप लावला होता. एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतही तिने पुन्हा एकदा यावर भाष्य केलं. कंगनाचा या मुलाखतीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आणि आता त्यात करण जोहरचा (Karan Johar) एक जुना व्हिडीओदेखील व्हायरल होऊ लागला आहे. ज्यामध्ये तो कंगनाच्या आरोपांवर बोलतो आहे. करण जोहरचा हा व्हिडीओ एका एवेंटमधील आहे, जो अनेकांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. यामध्ये करण कंगनाविरोधात बोलताना दिसतो आहे. कंगनाला जर इंडस्ट्रीत इतका त्रास होतो तर ती इंडस्ट्री सोडून दुसरं काही का करत नाही, असं तो म्हणाला आहे. या व्हिडीओत करण म्हणाला, "कंगनामार्फत वापरल्या जाणाऱ्या वुमेन कार्ड आणि व्हिक्टिम कार्डमुळे मी आता वैतागलो आहे. तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी पीडित असू शकत नाहीत. तुमच्याकडे नेहमीच सांगण्यासाठी दु:खद कहानी असते. तुम्हाला इंडस्ट्रीत इतका त्रास होतो तर सोडून द्या आणि दुसरं काहीतरी करा. इथं काम करण्यासाठी तुमच्यावर बंदूक रोखून कोण दबाव टाकतं आहे. सर्वांनी कंगनाला चण्याच्या झाडावर चढवलं आहे, त्यामुळे असं होतं आहे" करण जोहरचा हा व्हिडीओ शेअर करून अनेकांनी कंगनाला आपला पाठिंबा दिला आहे. हे वाचा -  कंगनाचा आरोप; सलमानबरोबरचा चित्रपट नाकारला म्हणून आदित्य चोप्राने दिली धमकी कंगनाने एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत करणवर आरोप केला होता की, सुशांत सिंह राजपूतला त्याने फ्लॉप अभिनेता म्हणून घोषित केलं होतं आणि टेकर्स मिळत नाहीत असं सांगून त्याची फिल्म ड्राइव्हदेखील थिएटरमध्ये रिलीज केली नव्हती. कंगनाने या मुलाखतीत इतर काही बॉलीवूड सेलिब्रिटींबाबतही धक्दकादायक खुलासे केले होते. जर मी सांगितलेल्या गोष्टी सिद्ध करू शकले नाही तर माझा पद्मश्री पुरस्कार परत देईन, असंही ती म्हणाली होती.
First published:

Tags: Kangana ranaut, Karan Johar

पुढील बातम्या