Home /News /entertainment /

शाहरुखला वाटतेय या गोष्टीची चिंता; करणने VIDEO शेयर करत उडवली खिल्ली

शाहरुखला वाटतेय या गोष्टीची चिंता; करणने VIDEO शेयर करत उडवली खिल्ली

दरम्यान करण जोहरने ट्विट करत म्हटलं, 'वाटतं बादशाहला FOMO झाला आहे.

    मुंबई, 12 सप्टेंबर- बॉलिवूड किंग म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान(Shahrukh Khan) गेली अनेक दिवस पडद्यापासून दूर आहे. शाहरूखचे चाहते अनेक दिवसांपासून त्याच्या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान करण जोहरने(Karan Johar) ट्विट करत म्हटलं, 'वाटतं बादशाहला FOMO झाला आहे. यावर ट्विट करत शाहरुखने म्हटलं आहे, 'पिक्चर तो अभी बाकी है..मेरे दोस्त'. नुकताच करण जोहरने शाहरुख खानसंबंधी एक व्हिडीओ शेयर केला होता. हा व्हिडीओ पाहता पाहता व्हायरल झाला आहे. सांगायचं झालं तर करण जोहरने डिस्ने प्लस हॉटस्टाच्या प्रमोशनचा हा व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेयर करत करण जोहरने लिहिलं आहे, 'मी कधीच विचार केला नव्हता, कि मी हा दिवससुद्धा पाहीन कि ज्या दिवशी बॉलिवूडच्या बाद्शाहला FOMO(Fear Of Missing Out )ची जाणीव होईल. पण आत्ता मी सर्वकाही पाहिलं आहे'. (हे वाचा:रश्मिका मंदनाने डॉगीला केलं KISS; चाहत्यांनी दिल्या भन्नाट कमेंट्) या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता शाहरुख खान आपल्या बाल्कनीमध्ये उभा आहे. आणि तिथून आपल्या चाहत्यांना हात उंच करून अभिवादन करत आहे. तसेच शाहरुख आपल्यासोबत उभा असणारा अभिनेता राजेश जैसला म्हणतो 'पाहिलंस, इतक्या मोठ्या प्रमाणात चाहते कधी कोणाच्या घरासमोर पाहिले आहेत का? यावर राजेश म्हणतो नाही सर कधीच नाही. मात्र पुढचं काही सांगू शकत नाही.' यावर शाहरुख विचारतो म्हणजे, त्याला उत्तर देत राजेश म्हणतो, 'बाकी सगळ्यांच्या तर डिस्ने हॉटस्टारवर चित्रपट येत आहेत. (हे वाचा:KBC मध्ये हॉट सीटवर दिसणार नीरज चोप्रा आणि पी.आर.श्रीजेश: प्रोमो आला समोर) यावर शाहरुख विचारतो बाकी कोण तर राजेश म्हणतो अजय देवगण, अक्षय कुमार, सैफ अली खान संजय दत्त' यावर शाहरुख पुन्हा विचारतो सर्वच आहेत का? त्यावर राजेश सांगतो नाही सर्व तर नाहीत शाहरुख म्हणतो कोण नाही अजून यावर उत्तर देत राजेश सांगतो सर तुम्ही नाही'. असा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Shahrukh khan

    पुढील बातम्या