आता रणवीरची शिकवणी घेणार कपिल देव, जाणून घ्या कशी ते

आता रणवीरची शिकवणी घेणार कपिल देव, जाणून घ्या कशी ते

रणवीर सिंगला क्रिकेटचं ट्रेनिंग द्यायला कपिल देव सज्ज झालेत.

  • Share this:

मुंबई, 09 फेब्रुवारी : या महिन्यात रणवीर सिंगचा गली बाॅय सिनेमा रिलीज होतोय. पण त्याच्या आणखी एका सिनेमाची चर्चा आहे. त्यासाठी तो जोरदार मेहनत घेतोय. तो सिनेमा आहे '83'.

83 साठी रणवीरला खास ट्रेनिंग द्यायला येणार आहे कपिल देव. रणवीर कपिल देवच्याच भूमिकेत आहे. खुद्द कपिल देव रणवीरला मोहालीच्या स्टेडियममध्ये क्रिकेटचं ट्रेनिंग देणार आहे.

रणवीर तर खूपच खूश आहे. अगोदर त्यानं बलवीरसिंग  संधूंकडून ट्रेनिंग घेतलं होतं. एका मुलाखतीत रणवीर म्हणाला, ' कपिल देव यांचे विचार, एनर्जी, निर्णयक्षमता सर्व काही जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.'

कबीर खान दिग्दर्शित 83 सिनेमा हा 1983ला भारतानं मिळवलेल्या क्रिकेट विश्वकपावर आहे. रणवीर कपिल देवकडून त्यावेळचे सगळे बारकावे समजून घेणार आहे.

काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग आणि आलिया भट्टचा 'गली बाॅय'चं ट्रेलर नुकताच रिलीज झालं आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमधून सिनेमाची कथा स्पष्ट होत आहे. गली बॉईज सिनेमात रणवीर एका हिप हॉप गायकाची भूमिका साकारतो आहे. हिप हॉप गाण्याबद्दल असलेलं रणवीरचं वेडेपण सिनेमात दिसून येत आहे. यात रणवीर सिंग एका झोपडपट्टीत राहत असतो आणि त्याला रॅप साँग गात त्यातच त्याला करियरही करायचं आहे पण त्याची परिस्थितीसोबत असलेली तडजोड चित्रपटात दिसून येत आहे.

First published: February 8, 2019, 7:26 PM IST

ताज्या बातम्या