मुंबई 17 ऑगस्ट: बॉलिवूडमधली बिनधास्त गर्ल कंगना रणौतने आता अमिर खानवर (Aamir Khan) हल्लाबोल केला आहे. अमिर खान सध्या तुर्कीमध्ये (Turkey) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha)च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याने तिथल्या राष्ट्रपतींच्या पत्नीची भेट घेऊन चर्चा केली होती त्यावर सध्या अमिरला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. याच चर्चेचा संदर्भ घेऊन तिने अमिर खानच्या धर्मनिरपेक्षतेवर शंका उपस्थित केलीय.
कंगनाने अमिर खानचा एक जुना व्हिडीओ शेअर करत त्याच्या धर्मनिरपेक्षतेवरच शंका उपस्थित केली होती. मुलांना मुस्लिम धर्माच्या तत्वज्ञानाबरोबरच हिंदू संस्कृतीचेही धडे दे असाही सल्ला तिने अमिर खानला दिला आहे.
सध्या ट्विटरवर आमिर खानविरोधात नेटकऱ्यांचा नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. आमिरनं आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तुर्कीमधील फर्स्ट लेडी अर्थात राष्ट्रपतींच्या पत्नीची रविवारी भेट घेतली. त्यांच्या भेटीचे फोटो एमीन एर्दोगान यांनी ट्वीट केल्यानंतर भारतात या फोटोवर नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Hindu + Muslim = Muslim Yeh toh kattarpanthi hai,outcome of a marriage is not just a blend of genes and cultures but even religions. Bachchon ko Allah ki ebadat bhi seekhayein aur Shri Krishn ki Bhakti bhi, yehi secularism hai na? @aamir_khan https://t.co/qo1ZOLNR7K
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 17, 2020
सध्या आमिर त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेला 'लाल सिंह चड्डा' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचं शूटिंग तुर्कस्थानमधील वेगवेगळ्या भागांध्ये केलं जात आहे. या शूटिंगनिमित्तानं आमिर सध्या तुर्कीत आहे. तिथे रविवारी त्यानं राष्ट्रपतींच्या पत्नी एमीन एर्दोगान यांची भेट घेतली.
याच कारणही तेवढंच खास आहे. तुर्कीच्या राष्ट्रपतींनी 370च्या मुद्यावर पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. देशात जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवताना त्याचा विरोध करणारे ही तुर्कीचे राष्ट्रपतीचे होते. त्यामुळे आमिर खाननं ही भेट घेणं अपेक्षित नसल्यानं सोशल मीडियावर नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.