मुंबई, 01 सप्टेंबर : कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे प्रत्येकाच्या आयुष्यावर काहीना काही तरी परिणाम झाला आहे. यापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी घरीच राहण्याचा पर्याय स्विकारला आहे. बॉलिवूडमध्ये देखील अनेकांवर कोरोनाचे सावट आहे. अशावेळी बॉलिवूड कलाकारांना त्यांच्या मुलांची चिंता आहे. अजय देवगण (Ajay Devgan) आणि काजोल (Kajol) यांना देखील त्यांची मुलगी न्यासा (Nysa) हिची चिंता आहे. गेले काही दिवस न्यासा भारतात आहे. मात्र ती शिक्षणासाठी सिंगापूर (Singapore) मध्ये राहते. मात्र अशी माहिती समोर येत आहे की, अजय आणि काजोल न्यासाला एकटीला सिंगापूरला पाठवण्यास तयार नाही आहे. यामुळे काजोल देखील सिंगापूरला जाण्याच्या तयारीत आहे.
अजय-काजोलची मुलगी न्यासा सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. मुंबई मिररच्या एका अहवालानुसार काजोल तिच्या मुलीला एकटीला सिंगापूरला पाठवणार नाही आहे. त्यामुळे तिने असे म्हटले आहे की, ठराविक काळासाठी ती मुलगी न्यासाबरोबर सिंगापूरमध्ये राहणार आहे. तर अजय देवगण त्यांचा मुलगा युग याच्याबरोबर मुंबईमध्ये राहिल.
(हे वाचा-वयाची तिशी ओलांडली तरी केलं नाही लग्न; 16 सुंदर अविवाहित अभिनेत्रींचे PHOTO)
या अहवालानुसार न्यासा सिंगापूरच्या युनायडेट वर्ल्ड कॉलेज ऑफ साउथ ईस्ट एशियामध्ये शिकत आहे. 2018 मध्ये अजयने सिंगापूरमध्ये एक फ्लॅट देखील खरेदी केला होता, जेणेकरून न्यासाला राहण्यास कोणती अडचण येणार नाही. काजोल आता याठिकाणी जाऊन राहणार आहे. या मीडिया अहवालाच्या मते अजय सध्या दोन स्क्रीप्ट्सवर काम करत आहे. त्याचप्रमाणे तो त्याच्या पुढील सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये देखील व्यस्त आहे. तो भुज: द प्राइड ऑफ इंडिया आणि सय्यज अब्दुल रहीम यांची बायोपिक फिल्म मैदान यांवर काम करत आहे. त्यामुळे अजय भारतातच थांबणार आहे.
(हे वाचा-आपल्या फेव्हरेट को-स्टारसह शूट करतेय करीना कपूर; उत्साहाने शेअर केला VIDEO)
न्यासा गेल्या काही कालावधीपासून सिंगापूरमध्येच आहे. सुट्टीच्या वेळी ती तिच्या आई-बाबांकडे मुंबईत येते. काजोल आणि अजय देखील त्यांचा रिकामा वेळ मुलांबरोबर घालवताना पाहायला मिळतात.