मुंबई, 06 जुलै : आई होणं हे बहुतांश स्त्रियांचं स्वप्न असतं. बॉलिवूड अभिनेत्रीदेखील (Bollywood Actresses) या गोष्टीला अपवाद नाहीत. कोणत्याही अभिनेत्रीचं आई होणं हा तिच्या फॅन्ससाठी मोठा उत्सुकतेचा विषय ठरतो. यात आता अजून एका अभिनेत्रीची भर पडणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची मुलगी आणि अभिनेत्री काजोलची (Kajol) धाकटी बहीण तनिषा मुखर्जी (Tanisha Mukharji). काही अभिनेत्रींनी आपली बीजांडं गोठवून ठेवण्याचा (Eggs Freeze) निर्णय घेतला आहे. त्यापैकी काही अभिनेत्री या माध्यमातून आईदेखील झाल्या आहेत आता तनिषानेदेखील अशाच पद्धतीने आई होण्याचा निर्णय घेतला आहे.
अविवाहित असलेल्या तनिषा मुखर्जीने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं गुपित उलगडलं आहे. एका मुलाखतीत तिने आपल्या खासगी आयुष्याबाबत एक खुलासा केला आहे.
तनिषा मुखर्जीने नुकतीच ई-टाइम्सला मुलाखत दिली. त्यात ती म्हणाली, "मी वयाच्या 33व्या वर्षी माझी बीजांडं फ्रीज करू इच्छित होते. त्या वेळी मी माझ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला होता; मात्र त्यांनी त्या वेळी तसं न करण्याचा सल्ला मला दिला. त्यामुळे माझ्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. मूल जन्माला घालण्यासाठी अन्य कोणतेही पर्याय नसतील, तेव्हा असं करावं असा सल्ला त्यांनी मला दिला. हा पूर्णपणे माझा वैयक्तिक निर्णय असून, सध्या मूल न होऊ न देण्यात कोणतीही अडचण नाही"
हे वाचा - OMG! लंडनमध्ये सोनम स्वयंपाकापासून ते झाडू मारण्यापर्यंत करते सगळी काम; स्वतःच..
तनिषा म्हणाली की, "एका महिलेच्या जीवनाचं सर्वोच्च ध्येय मूल होणं हे असू शकत नाही. प्रत्येक स्त्रीला मूल व्हायलाच हवं, असं काही बंधनकारक नाही. लग्न करणंदेखील गरजेचं आहे असं मला वाटत नाही. तसंच तुम्ही रिलेशनशिपमध्ये असणं आणि तुम्हाला डिफाइन (Define) करण्यासाठी एखादा पुरुष तुमच्या आयुष्यात असणं हेदेखील जरूरीचं नाही"
याबाबत आई तनुजा यांची प्रतिक्रिया काय असं विचारलं असता तनिषा म्हणाली, की "माझ्या आईने नेहमीच माझ्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. माझी आई दूरदर्शी विचार करणारी महिला आहे"
हे वाचा - वर्कआऊट करताना खुशीच्या पोटावर बसला पांडा आणि...; जान्हवीने शेअर केला VIDEO
तनिषाने आई तनुजा आणि बहीण काजोल यांच्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तिचं फिल्मी करिअर (Filmy Career) फारसं उल्लेखनीय ठरलं नाही. त्यामुळे फ्लॉप अभिनेत्री अशी तिची तिची ओळख होऊ लागली. तनिषाने बिग बॉस 7मध्ये (Big Boss 7) सहभाग घेतला होता. त्या वेळी तिचं नाव बिग बॉस 7मधला प्रतिस्पर्धी अरमान कोहलीसोबत जोडले गेले होते; मात्र शोनंतर काही दिवसांतच या दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment