काजोल म्हणतेय, रुक रुक रुक...तुम्ही पाहिलंत का?

काजोल म्हणतेय, रुक रुक रुक...तुम्ही पाहिलंत का?

तुम्हाला अजय देवगणचा तब्बूसोबतचा विजयपथ आठवत असेल आणि त्यातलं रुक रुक रुक अरे बाबा रुक गाणं नक्कीच आठवत असेल. आता याच गाण्यावर थिरकायला काजोल सज्ज झालीय. याच गाण्याचं लाँच झालं.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर : बाॅलिवूड अभिनेत्री काजोलच खूप दिवसांनी आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. हेलिकाॅप्टर व्हिला सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता त्या सिनेमाचं गाणंही लाँच झालंय.

आता काजोल तिच्या सिनेमात अजय देवगणच्या गाण्यावरच थिरकताना दिसतेय. तुम्हाला अजय देवगणचा तब्बूसोबतचा विजयपथ आठवत असेल आणि त्यातलं रुक रुक रुक अरे बाबा रुक गाणं नक्कीच आठवत असेल. आता याच गाण्यावर थिरकायला काजोल सज्ज झालीय. याच गाण्याचं लाँच झालं.

काजोलचा आगामी चित्रपट 'हेलिकॉप्टर ईला' 12 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची निर्मिती अजय देवगणने केली आहे. या चित्रपटात काजोल सिंगल मदरच्या भूमिकेत दिसणार आहे. जी आपल्या मुलाबाबत खूप सेन्सिटिव्ह असते. या चित्रपटातील  रिलीज झालेली गाणी चांगलीच चर्चेत आहेत.

1994 साली प्रदर्शित झालेला चित्रपट विजयपथमधील रुक रुक रुक अरे बाबा रुक हे गाणे नव्याने पाहायला मिळतंय. या गाण्यावर काजोलनं परफॉर्म केलाय. या गाण्याला संगीत राघव सच्चर यांनी दिलं आहे आणि पालोमी घोषने स्वरसाज दिला आहे.

'हेलिकॉप्टर ईला' चित्रपटात काजोलने ईलाची भूमिका साकारली आहे. तिला गाणे गाण्याची आवड असते. मात्र मुलाच्या जबाबदाऱ्यांमुळे ती आपल्या आवडीकडे दुर्लक्ष करते. तिला आपल्या मुलाचे संगोपन खूप चांगलं करायचं असतं. त्यामुळे नेहमी त्याच्यासोबत राहून ती त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असते, असं या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी अजय देवगणनं काजोलचा फोन नंबर शेअर केला होती. तो या सिनेमाच्या प्रमोशनचाच एक भाग होता.

VIDEO : लता दीदी@90 : लता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरंच भांडण होतं का? खुद्द दीदींनीच केला खुलासा!

First published: September 26, 2018, 11:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading