कादर खान यांना मरन्नोत्तर पद्मश्री, कामाठीपुरा ते बाॅलिवूड डोळ्यात पाणी आणणारा प्रवास

शिक्षकाची नोकरी करत असतानाच त्यांनी एका नाटकाही भाग घेतला होता.

  • Share this:

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च सन्मान  असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विनोदी अभिनेते कादर खान यांना मरन्नोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कादर खान याच महिन्यात 1 जानेवारी रोजी निधन झालं. त्याच्या निधनानंतर पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

 ज्येष्ठ विनोदी अभिनेते कादर खान यांना देशाचा सर्वोच्च समजला जाणारा विनोदाचं सुपरहिट टायमिंग असणाऱ्या कादर खान यांनी इंजीनिअरिंगची पदवी घेतली होती.

विनोदाचं सुपरहिट टायमिंग असणाऱ्या कादर खान यांनी इंजीनिअरिंगची पदवी घेतली होती.

सिनेमात एंट्री घेण्याआधी ते मुंबईतील एम.एच.साबू सिद्दीक इंजीनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल इंजीनिअरिंग शिकवत होते.

शिक्षकाची नोकरी करत असतानाच त्यांनी एका नाटकाही भाग घेतला होता. या कार्यक्रमात अनेक मोठे कलाकार सहभागी झाले होते.

नाटकाच्या कार्यक्रमात सामील असणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हे कादर खान यांच्या अभिनयाने प्रभावित झाले.

कादर खान यांच्या अभिनयाने खूश झालेल्या दिलीप कुमार यांनी पुढे त्यांना आपल्या एका सिनेमासाठी साईन केले.

अभिनय कारकीर्द गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी कॅनडातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर त्यांनी आज जगाचा निरोप घेतला. कादर खान यांना प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर हा आजार होता.

अभिनय कारकीर्द गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी 1 जानेवारी 2019 रोजी कॅनडातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर त्यांनी आज जगाचा निरोप घेतला. कादर खान यांना प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर हा आजार होता.

कादर खान यांचा जन्म अफगाणिस्तानातील काबुलमध्ये झाला. जन्मानंतर आई- बाबा मुंबईत आले.

मुंबईतील अतिशय वाईट आणि दुर्गंधीचं साम्राज्य असणाऱ्या कामाठीपुरा झोपडपट्टीत त्यांचं बालपण गेलं. आई- वडिलांच्या घटस्फोटानंतर घराची आर्थिक स्थिती अजून बिकट झाली.

आईच्या माहेरच्यांनी तिचं दुसऱ्यांदा लग्न लाऊन दिलं. मात्र सावत्र बाप काही काम न करता फक्त बसून राहायचा. सावत्र बाप कादर यांना आपल्या पहिल्या पित्याकडून पैसे मागून आणायला पाठवायचे.

कादर आपल्या वडिलांकडे जाऊन २ रुपयांची भिक मागायचे. अनेक दिवसांपासून उपाशी असल्यामुळे काही खायला द्या याची ते त्यांच्याकडे याचना करायचे. वडिलही इतरांकडून उधारीवर १-२ रुपये आणून कादर यांच्या हातावर ठेवायचे.

घरची गरिबी एवढी होती की ते आठवड्यातले फक्त तीन दिवस जेवायचे तर उरलेले दिवस त्यांना उपाशीच रहावं लागायचं.

कठीण प्रसंगातून वाट काढताना कादर खान कधी तुटले नाहीत. मात्र त्यांच्या आईच्या मृत्यूने त्यांना पुरतं हलवलं.

१ एप्रिलचा तो दिवस कादर खान अख्या आयुष्यात कधीच विसरु शकले नाहीत. त्यांच्या आईने अथक परिश्रम करुन तीनही मुलांना लहानाचं मोठं करुन चांगलं शिक्षण दिलं.

त्या दिवशी आई एका पातेल्यात रक्ताच्या उलटी करत होती आणि नंतर ती उलटी मोरीत टाकत होती. मी डॉक्टरांकडे धावत जाऊन आईला बघायला यायला सांगितलं तर त्यांनी स्पष्ट नकार दिला.

एखाद्या सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे मी डॉक्टरांना जबरदस्ती उचलून घेऊन घरी आलो आणि आईला पाहायला सांगितलं. मात्र तोवर उशीर झाला होता.

आई गेल्याचा मी ज्यांना फोन केला त्या सर्वांना मी मस्करी करत असल्याचं वाटलं. कोणतीही मस्करी कर पण अशी थट्टा करू नकोस असा सल्लाही त्यांनी मला दिला.

कादर यांच्या आईला मुलांनी खूप शिकावं असं वाटतं होतं. शिक्षणानेच गरिबी दूर होईल यावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांनी कादर यांना इंजीनिअरिंगचं शिक्षण दिलं.

आईने कादर यांना स्पष्ट शब्दात सांगितले होते की, या गरिबीशी मी दोन हात करेन. तुला काही करायचंच असेल तर तू फक्त अभ्यास कर. भरपूर अभ्यास कर आणि सतत अभ्यास कर. आईच्या बोलण्यात कादर यांना अभ्यास या शब्दावर एवढा जोर जाणवला की त्यातून तिची तळमळ त्यांना दिसली.

कादर यांनी इस्माइल यूसुफ कॉलेजमधऊन इंजीनिअरिंग केले. त्यानंतर एमएच साबू सिद्दीकी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजीनिअरिंगसाठी ते प्राध्यापक होते.

दरम्यान, दिलीप कुमार यांनी एका नाटकात कादर यांचं काम पाहिलं आणि त्यांना आपल्या पुढच्या सिनेमासाठी साइन केलं. अशा पद्धतीने कादर यांची बॉलिवूडमध्ये एण्ट्री झाली. यानंतर कादर यांनी मागे वळून पाहिलं नाही. लेखन, अभिनय, दिग्दर्शन या सर्व पातळीवर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2019 07:17 PM IST

ताज्या बातम्या