RAW चं ट्रेलर रिलीज, जाॅनची वेगवेगळी रूपं पाहून तुम्हाला बसेल धक्का

RAW चं ट्रेलर रिलीज, जाॅनची वेगवेगळी रूपं पाहून तुम्हाला बसेल धक्का

जाॅन अब्राहमच्या RAW सिनेमाचं ट्रेलर रिलीज झालंय. यात 'ऐ वतन ऐ वतन हमको तेरी कसम' या गाण्याबरोबर वेगवेगळ्या घटना दाखवल्यात.

  • Share this:

मुंबई, 04 मार्च : जाॅन अब्राहमच्या RAW सिनेमाचं ट्रेलर रिलीज झालंय. यात 'ऐ वतन ऐ वतन हमको तेरी कसम' या गाण्याबरोबर वेगवेगळ्या घटना दाखवल्यात. यासोबत जाॅनचे वेगवेगळे लूक्सही समोर आलेत. हा ट्रेलर एकदम प्रभावी वाटतोय. त्यामुळे सिनेमा चांगला असेल ही अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

या ट्रेलरमुळे एक खास माहिती समोर आलीय. ती म्हणजे या सिनेमाची रिलीज डेट. सुरुवातीला रिलीज तारीख होती 12 एप्रिल. पण आता त्यात बदल करणार असल्याची माहिती समोर आलीय.

17 एप्रिल रोजी करण जोहरचा कलंक रिलीज होणार आहे. राॅ सिनेमा एक आठवडा आधी रिलीज झाला, तर दोन्ही सिनेमांच्या कमाईवर परिणाम होईल. म्हणून हा सिनेमा निर्मात्यांनी 4 एप्रिलला रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय. सिनेब्लिट्जच्या माहितीनुसार राॅचे निर्माते बाॅक्स आॅफिसवर अजिबात नुकसान सहन करू शकत नाहीत.

जाॅन अब्राहमचा राॅ एक खऱ्याखुऱ्या गुप्तहेरावर बेतलाय. त्यानं देशासाठी बलिदान दिलं होतं. सिनेमाचं दिग्दर्शन रॉबी ग्रेवालनं केलंय. सिनेमात  सुचित्रा कृष्णमूर्ति, जॅकी श्रॉफ आणि सिकंदर खेर यांच्या भूमिकाही आहेत.

जाॅन अब्राहमनं नुकताच सविता दामोदर परांजपे प्रोड्युस केला. त्याच्याबद्दल सुबोध भावे म्हणाला होता, ' जाॅन हा साधा सरळ अभिनेता आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्यानं निर्माता म्हणून नेहमीच वेगळे सिनेमे दिलेत. तो चांगला, सज्जन आहे.'

सिनेमाचा विषय आवडला म्हणून मी निर्मिती करतोय, असं तो म्हणाला होता. जाॅनला मराठी सिनेमात काम करायचंय. आणि सिनेमाचा नायक सुबोध भावेला त्यानं मलाही मराठी सिनेमात काम करण्याची संधी दे म्हणून सांगितलंय.

रात्रीस खेळ चाले : अण्णांबरोबर माधव करणार 'अशी' बंडखोरी

First published: March 4, 2019, 5:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading